कोरोनामुक्त व्यक्तींनी प्लाझ्मादानासाठी पुढे यावे; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

भाग्यश्री भुवड
Tuesday, 8 September 2020

रक्तदानाऐवढेच प्लाझ्मादान श्रेष्ठ  आहे. प्लाझ्मा दान केल्याने व्यक्तीच्या आरोग्यावर काहीही परिणाम होत नाही. मात्र, त्यातून गरजूंचे जीव नक्की वाचू शकतात.

मुंबई : रक्तदानाऐवढेच प्लाझ्मादान श्रेष्ठ  आहे. प्लाझ्मा दान केल्याने व्यक्तीच्या आरोग्यावर काहीही परिणाम होत नाही. मात्र, त्यातून गरजूंचे जीव नक्की वाचू शकतात. त्यामुळे महाराष्ट्रात जे पाच लाख लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांनी प्लाझ्मादानासाठी पुढे यावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

मंदिर उघडण्यासाठी मनसेचे आंदोलन; विरुपाक्ष मंदिराचे टाळे तोडून केली महाआरती

कोरोनामुक्त झालेल्या या योद्ध्यांनी प्लाझ्मा दानाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा. त्यातील अनेकजण प्लाझ्मा दानासाठी पात्र असू शकतात, असेही टोपे यांनी सांगितले.  पुढे आरोग्यमंत्री म्हणाले, प्लाझ्माचा प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहे. त्यामध्ये यशही मिळत आहे. साधारणपणे दहापैकी नऊ प्रकरणांमध्ये प्लाझ्मा दिल्यानंतर रुग्ण बऱ्यापैकी लवकर बरे झाले, असा त्यातला अनुभव आहे. त्यामुळे आपल्या प्लाझ्मा दानातून अनेकांचे जीव वाचू शकतात, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णवाढीचा भडका; BMC ने दिले 'हे' कारण

तसेच,  प्लाझ्मा दानासाठी लोकांचे प्रबोधन करणे, त्यांना प्रोत्साहित करणे आणि प्लाझ्मा दानासाठी प्रवृत्त करणे महत्वाचे आहे. काही स्वयंसेवी संस्थांनी त्यामध्ये सहभाग घेऊन या कार्यक्रमास प्रतिसाद दिल्यास नक्कीच यात वाढ होऊ शकते. त्यामुळे संस्थांनीही यासाठी हातभार लावावा, असे आवाहन टोपे यांनी केले आहे. 

प्लाझ्मा दान कोण करु शकेल?
18 ते 60 वयोगटातील व्यक्ती जिचे वजन 50 किलोपेक्षा जास्त असेल. रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, मुत्रपिंड, हृदयविकार नसतील अशा व्यक्तींचा प्लाझ्मा वापरता येतो. कोरोनातून बरे झाल्यानंतर 28 दिवसांनी प्लाझ्मा दान करता येतो. 

वरळी येथील इमारतीच्या लिफ्टमध्ये गुदमरून एकाचा मृत्यू; पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू

समुह प्रतिकारशक्तीची सुरूवात
राज्यातील सिरो सर्व्हेलन्सबाबत आरोग्यमंत्र्यांनी सांगितले कि, धारावीमध्ये 100 पैकी 56 लोकांमध्ये अँटीबॉडीज सापडल्या. याचा अर्थ प्रतिकारशक्ती निर्माण होण्याची सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, मालेगाव आणि औरंगाबादमध्ये काही प्रमाणात हा सर्व्हे झाला. राज्यात आणखी काही हॉटस्पॉटमध्ये हा सर्व्हे करण्याचा मानस आहे.
------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona-free individuals should come forward for plasma donation; Appeal by Health Minister Rajesh Tope