मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णवाढीचा भडका; BMC ने दिले 'हे' कारण

समीर सुर्वे
Monday, 7 September 2020

मुंबईत कोव्हिड चाचण्या वाढल्या असून त्यामुळे रुग्णवाढीचा वेग वाढला आहे.असा दावा महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे

मुंबई: मुंबईत कोव्हिड चाचण्या वाढल्या असून त्यामुळे रुग्णवाढीचा वेग वाढला आहे.असा दावा महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. ही वाढतील रुग्ण संख्या लक्षात घेऊन 250 अतिरीक्त आयसीयू आणि जंम्बो कोव्हिड सेंटर मध्ये 6200 बेड्‌सची सोय करण्यात येणार आहे. 

'त्या' इशाऱ्यानंतर अदानी ग्रुपचे शिष्ठमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला; वाढीव वीजबिलांबाबत चर्चा

ऑगस्ट महिन्यात रोज 1 हजार ते 1300 नव्या रुग्णांची नोंद होत होती.ती आता 1700 ते 2000 हजारा पर्यंत पोहचली आहे.मात्र,वाढलेल्या रुग्णसंख्ये मागे वाढलेल्या चाचण्या कारण असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. ऑगस्ट महिन्यात मुंबईत रोज 7619 चाचण्या होत होत्या.तर,आज ही संख्या 11861 पर्यंत पोहचली असून ती अधिक वाढवून 14 हजार पर्यंत चाचण्या करण्याचे नियोजन सुरु आहे. वाढलेल्या चाचण्यामुळे रुग्णवाढीचा वेग वाढला आहे. रुग्णसंख्या वाढलेली असली तरी कोविड केंद्र आणि विलगीकरण केंद्रात आजही 4800 बेड्‌स रिक्त आहेत.त्याच बरोबर जंम्बो कोव्हिड केंद्रात लवकरच 6200 बेड्‌स तयार करण्यात येणार आहेत. 

मंदिर उघडण्यासाठी मनसेचे आंदोलन; विरुपाक्ष मंदिराचे टाळे तोडून केली महाआरती

मुंबईत आयसीयू बेड्‌सचीही कमतरता नाही. सध्याच्या परिस्थितीत 2 हजार 646 आयसीयू बेड्‌स असून त्यातील 152 बेड्‌स रिक्त आहेत.रोज सरासरी 150 आयसीयू बेड्‌स रिक्त असतात. मात्र, 250 आयसीयू बेड्‌स नव्याने तयार करण्यात येणार आहे. असे पालिकेकडून सांगण्यात आले. ही तयारी पुढील तीन दिवसात पुर्ण होणार आहे.पालिकेने कोव्हिड चाचण्या वाढवल्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. रुग्ण संख्येत वाढ होत असली तरी त्यात लक्षणं नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त  आहेत. 5 सप्टेंबरच्या पालिकेतील नोंदी नुसार उपचार सुरु असलेल्या 22 हजार 975 रुग्णांपैकी 15 हजार 307 रुग्ण लक्षण विरहीत आहेत. तर,6558 रुग्णांमध्ये लक्षणे आहेत.अत्यावस्थ रुग्णांची संख्या 1110 आहे. 

'मेहनतीतून कमावलेलं माझं ऑफिस BMC तोडणार'; ऑफिसमध्ये जबरजस्ती अधिकारी घुसल्याचा कंगनाचा आरोप

महिन्यानुसार रोज होणाऱ्या सरासरी चाचण्या
(जुलै पासून रॅपिड टेस्ट अंर्तभुत ) 
मे,जून - 4000 
जुलै - 6500 
ऑगस्ट - 7619 
सप्टेंबर- 10 हजाराहून अधिक 
---- 
50 हजार चाचण्या करा 

मुंबईत रोज 7 ते 8 हजार चाचण्या होत असल्याचा दावा भाजपने केला आहे.आता  चाचण्याची संख्या आता 50 हजारा पर्यंत नेण्याची आवश्‍यकता आहे.असे पत्र आज भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महानगर पालिकेला दिले.मुंबईत रोज 1800 ते 2000 हजार रुग्ण आढळत असून चाचण्याच्या तुलनेने रुग्ण आढळण्याचा दर वाढला आहे.असा दावाही त्यांनी केला.त्यामुळे कोविड बाबत होणाऱ्या सर्व चाचण्याची संख्या रोज 50 हजारा पर्यंत नेण्याची आवश्‍यकता आहे.असेही त्यांनी नमुद केले.

----------------------------------

( संपादन - तुषार सोनवंणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona outbreak erupts again in Mumbai; BMC gave this reason