samshan bhumi
samshan bhumi

कोरोनानं काय वेळ आणली; नाती तर दुरावलीच अन् आता अंत्यदर्शनही घेता येईना

ठाणे : कोरोना विषाणूने कुठे नात्यातील कटुता कमी केली आहे, तर कुठे मात्र भितीपोटी रक्ताच्या नात्यातही दुरावा आणला आहे. माता-पित्याचे निधन झाले तरी मुंबईत स्थायिक भावडांना गावचे भावंडच गावी अंतिम संस्काराला येऊ नका असे स्पष्ट सांगत आहेत. कोरोनाविषयीच्या गैरसमजामुळे यापेक्षा दुसरे दुर्दैव काय असावे अशी आगतिकता मुंबईकर व्यक्त करीत आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने 31 जुलैपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यातच मुंबई, ठाणे व उपनगरात 12 जुलैपर्यंत कडकडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना बाधितांची संख्या जास्त असल्याने मुंबई व पुणेकरांसाठी अनेक जिल्ह्यांच्या सीमा आधीच बंद करण्यात आल्या आहेत. परंतू घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतरही मुंबईत स्थायिक नागरिकांना गावी येण्यास बंदी घातली जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांची माणुसकी संपत असल्याची भावना मुंबईकरांच्या मनात निर्माण होत आहे. 

डोंबिवली येथे राहणारे अमित (नाव बदलले आहे) म्हणाले, माझ्या आईच्या आईचे नुकतेच निधन झाले. लॉकडाऊन असले तरी निधनाचे वृत्त समजताच आम्ही खासगी गाडी मिळविण्यासाठी धावाधाव करीत होतो. मात्र मामाने फोन करुन सांगितले, तुम्हाला गावी येता येणार नाही. गावात प्रवेश दिला जाणार नाही, उगाच धावपळ करीत येऊ नका. गावात आमच्यामुळे कोणाला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून आम्हाला रोखले. घरातील व्यक्तींनीही त्यासाठी पुढाकार घेऊ नये याचे जास्त वाईट वाटले. आईला सांभाळणे, तिला ही माहिती देणे तर आमच्यासाठी कठीणच झाले होते. ठाणे येथील श्रावणी (नाव बदलले आहे) म्हणाल्या, माझ्या सासऱ्यांचे निधन झाले, आमची स्वतःची गाडी असल्याने आम्ही त्वरीत कऱ्हाडला जाण्यास निघालो. वाटेत पोलिसांनी अडविले परंतू त्यांना कारण सांगितल्यानंतर त्यांनी जाऊ दिले. परंतू गावी आम्हाला लांब बसवले, तसेच अंतिम संस्कार झाल्यानंतर घरातील नातेवाईकांनी आम्हाला घरात न घेता त्वरीत पुन्हा जाण्यास सांगितले.

माझ्या आईला तीच्या भावानेच रोखले
डोंबिवलीतील शितल (नाव बदलले आहे) दोनच दिवसांपूर्वी सातारा येथे माझ्या आजीचे निधन झाले. भाऊ व माझी आईने त्वरीत गावी जाण्यासाठी वाहनाची शोधाशोध सुरु केली. मात्र गावी स्थायिक असणारे मामा मावशी म्हणाले, गावी येऊ नये हेच चांगले, तुमच्यामुळे गावातील कोणाला त्रास नको. आम्हाला कोरोना झालेला नाही, तसेच आम्ही गावच्या नागरिकांमध्ये जाऊन मिसळणारही नव्हतो. परंतू तरीही आम्हाला गावी न येण्यास सांगितले गेले, आईला भावानेच ही गोष्ट सांगितल्याने तिला याचे जास्त वाईट वाटत आहे.

corona has also caused a rift in the blood relationship due to fear

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com