कोरोनामुळे मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम;  कुटुंबनियोजन, मोतिबिंदू शस्त्रक्रिया ते लसीकरण मोहीम रखडल्या

मिलिंद तांबे
Sunday, 30 August 2020

  • गेल्या वर्षीच्या तुलनेत या मार्च ते जुलै या महिन्यात लसीकरण 60 टक्क्याने कमी झाल्या आहेत.
  • याच कालात उर्वरीत राज्यात झालेल्या लसीकरणाच्या संख्येपेक्षा ही दुपट्ट आहे. या पाच महिन्याच्या काळात मोतिबिदूंच्या शस्त्रक्रीयांच्या संख्येत 92.8 टक्क्याने घट झाली आहे.

 

मुंबई - कोरोना संसर्गामुळे मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात संसर्गाच्या भितीने अनेकांनी शस्त्रक्रीया पुढे ढकलल्या, तर या काळात पालिका आणि खाजगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांवर आपले लक्ष केंद्रीत केले होते. शिवाय वाहतूक व्यवस्था ठप्प होती. या सर्वांचा एकत्रित परिणाम लसीकरण मोहीम, प्रसुतीपासून इतर महत्वाच्या शस्त्रक्रीयेवर झाल्याची माहिती समोर येत आहे.      मुंबई महानगरपालिका आणि राज्य आरोग्य सेवेच्या माहितीच्या आधारे हे स्पष्ट झालय. मात्र जुलै महिन्यापासून कोरोनाचा फैलाव आटोक्यात आल्यापासून हळूहळू आरोग्य सेवा सामान्य होत असल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत या मार्च ते जुलै या महिन्यात लसीकरण 60 टक्क्याने कमी झाल्या आहेत. याच कालात उर्वरीत राज्यात झालेल्या लसीकरणाच्या संख्येपेक्षा ही दुपट्ट आहे. या पाच महिन्याच्या काळात मोतिबिदूंच्या शस्त्रक्रीयांच्या संख्येत 92.8 टक्क्याने घट झाली आहे. या पाच महिन्याच्या कालावधीत पुरुष आणि महिलांवरच्या कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रीया 70.3 टक्काने कमी झाल्यात. तर राज्यात या कुटुंब नियोजनाच्या  शस्त्रक्रीया गेल्या वर्षाच्या तुलनेत 65 टक्क्यांनी घटल्याची नोंद आहे. 

लाॅकडाऊन काळात रेल्वे मालवाहतुकीमुळे 'मालामाल'; गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूलात 4.3 टक्याने वाढ

प्रसुतींची संख्या कमी
मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत मार्च ते जुलै  या महिन्यात प्रसुतीची संख्या 18.7 टक्के कमी झाल्याची नोंद आहे. मार्च ते जुलैच्या काळात मुंबईतील खाजगी आणि शासकीय रुग्णालयामध्ये 47,260 मुलांचा जन्म झाला. 2019  मध्ये या पाच महिन्यात एकुण 58,132 मुल जन्माला आली होती. 
या काळात वाहतूकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे रुग्णालयात पोहोचणे कठिण झाले होते.कल्याण, डोबिंवली, मिरा रोड, नवी मुंबई इथून मोठ्या संख्येने महिला प्रसुतीसाठी मुंबईच्या रुग्णालयात दाखल होणे पसंत करतात. मात्र यावेळी वाहतूक सुविधेअभावी त्या मुंबईच्या रुग्णालयात येऊ शकल्या नाही.दुसरी बाब म्हणजे लॉक़डाऊनमध्ये रोजगार गमावल्याने मोठ्या प्रमाणात कामगार आपआपल्या राज्यात निघून गेले. या सर्वांचा एकत्रीत परिमाण प्रसुतीच्या संख्येवर झाल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगीतलय.
या पाच महिन्याच्या कालाधीत नवजात बाळांच्या आयसीयूमधील  संख्याही 52.4 टक्काने कमी झाल्याची नोंद आहे. गेल्या वर्षी मुलांच्या आयसीयूमध्ये दाखल झालेल्या बाळांची संख्या 3681 होती. या पाच महिन्यात ती संख्या 1,751 एवढी होती. हॉस्पीटलमध्ये कोविड संसर्ग होण्याची भिती हे यामागील सर्वात मोठे कारण असल्याचे नगरसेवक अश्रफ आझमी यांचे म्हणणे आहे.

मुंबईकरांनो संकट टळलेलं नाही! वांद्रे, कुलाब्यात कोरोना संसर्गात वाढ; उत्तर मुंबईची परिस्थिती जैसे थे

लॉकडाऊन काळात अऩेकांनी  कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रीया टाळल्या, एप्रिल ते जूनमध्ये मुंबईत कोरोनाचा फैलाव जोरात होता, त्यामुळे या शस्त्रक्रीया टाळण्याकडे लोकांनी भर दिला. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर आता या शस्त्रक्रीया सुरु झाल्या आहेत अशी माहिती डॉ मिनाक्षी राव यांनी दिली. 

जुलै महिन्यात शहरातील कोरोना संसर्गाची परिस्थिती आटोक्यात येऊ लागली. त्यामुळे टाळलेल्या शस्त्रक्रीया करुन घेण्याकडे लोकांचा कल वाढलाय. एकट्या जुलै महिन्यात 223 मोतीबींदूच्या शस्त्रक्रीया झाल्या. तर या जुलै महिन्यात 8,146 मुलांचे लसीकरण झाले. मे महिन्यात ही संख्या केवळ 2,659 एवढी होती.

मुंबईची स्थिती सामान्य होत आहे. पालिकेने 72 खाजगी नर्सींग होम आणि रुग्णालयांना कोविड सेवेतून कमी केले आहे. त्यामुळे येत्या काळात आरोग्य सेवा पुर्णपणे जाग्यावर येईल अस अतिरीक्त पालिका आयुक्त सुरेश काकानी यांनी म्हटलय. 
....

मार्च ते जून-  लॉकडाऊन काळात आरोग्य सेवेवर परिणाम 

मोतीबिंदूच्या शस्त्रक्रीयांचे प्रमाण 92.8 टक्क्याने घटले
लसीकरणाचे प्रमाण कमी साडेपाच हजाराने कमी झाले 
कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रीया पुढे ढकलल्या 
नवजात शिशुंच्या आयसीयू वार्डमधील संख्या 52.4 % कमी 
मुंबईत प्रसुतींची संख्येत 18.7  टक्क्याने घट

कारण काय ?
-मार्च ते जुन महिन्यात मुंबईत कोरोना फैलाव वाढत होता
-संसर्ग होण्याच्या भितीने लोकांनी रुग्णालयात जाणे टाळले 
-शासकीय, खाजगी रुग्णालयांचा फोकस कोरोना रुग्णांकडे होता
-अनेक खाजगी रुग्णालयांनी इतर पेशंट घेणे बंद केले होते
-स्टाफ अभावी खाजगी रुग्णालयांनी अनेक शस्त्रक्रीया पुढे ढकलल्या 
-वाहतूक व्यवस्थेच्या अडचणीमुळे दवाखान्यात पोहोचणे कठिण 
-परप्रांतीय मजूर आपआपल्या राज्यात निघून गेले 

----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona has a major impact on Mumbais healthcare system; Family planning, cataract surgery to vaccination campaigns stalled