esakal | वसई विरार परिवहनाला कोरोनाचा फटका, 700 हून अधिक कर्मचारी वेतनाविना
sakal

बोलून बातमी शोधा

vasai bus.

लॉकडाऊनपासून केवळ 23 बस अत्यावश्‍यक सेवेसाठी सुरु असून, 50 कर्मचारी काम करत आहेत. त्यातून केवळ 23 लाख महिन्याला उत्त्पन्न येते. उर्वरित परिवहन सेवा ठप्प असून, बस आगारात जैसे थे उभ्या आहेत.

वसई विरार परिवहनाला कोरोनाचा फटका, 700 हून अधिक कर्मचारी वेतनाविना

sakal_logo
By
प्रसाद जोशी

वसई : वसई विरार शहर महापालिकेची परिवहन सेवा आधीच तोट्यात असताना, आता लॉकडाऊनचा देखील त्यावर मोठा परिणाम झाला आहे. पाच महिन्यात परिवहन सेवेला साडेबारा कोटींचा फटका सहन करावा लागला आहे. तर 750 कामगारांपैकी केवळ 50 कामगारांना वेतन दिले जात असल्याचे परिवहन व्यवस्थापनाचे म्हणणे आहे त्यामुळे उत्पन्नाअभावी अन्य कामगारांना वेतनापासून वंचित राहावे लागत आहे. 

हे ही वाचा : मुंबईत पावसाचा जोर ओसरताच बसू लागले उन्हाचे चटके; आज दिवसभरात इतक्या तापमानाची नोंद

वसई विरार महापालिकेने 2012 साली भगीरथ ट्रान्सपोर्ट या कंपनीकडून परिवहन सेवा सुरु केली. नागरिकांसाठी या परिवहन सेवेच्या 130 बस 38 मार्गावर सुविधा देत होत्या. जेष्ठ नागरिकांना, विद्यार्थ्यांना मोफत पास, ग्रामीण भागातील वाढत्या फेऱ्या पाहता नागरिक मोठ्या संख्येने प्रवास करत होते. मात्र आता लॉकडाऊनमुळे परिवहन सेवेला महिन्याला अडीच कोटी इतके उत्पन्न तर एप्रिल ते ऑगस्टपर्यंत एकत्रित साडेबारा कोटीच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.

नक्की वाचा : आरतीच्या वेळी गर्दी टाळण्यासाठी भन्नाट आयडिया; सोसायटीच्या मजल्यांमध्ये लावले लाऊड स्पीकर

लॉकडाऊनपासून केवळ 23 बस अत्यावश्‍यक सेवेसाठी सुरु असून, 50 कर्मचारी काम करत आहेत. त्यातून केवळ 23 लाख महिन्याला उत्त्पन्न येते. उर्वरित परिवहन सेवा ठप्प असून, बस आगारात जैसे थे उभ्या आहेत. बस खर्च, कामगारांचे वेतन हा प्रश्न ठेकेदारासमोर निर्माण झाला आहे. जरी सेवा सुरु केली तरी देखील सरकारच्या नियमाप्रमाणे मर्यादित प्रवासी घेता येणार असल्याने 50 आसनी बसमध्ये केवळ 25 प्रवासी प्रवेश दिला तर 250 रुपये फेरीप्रमाणे मिळतील. परंतु यातून एका फेरीचा डिझेल खर्च देखील भागवता येणे शक्‍य नाही. असे परिवहनचे म्हणणे आहे. वसई विरार शहर महापालिकेच्या आयुक्तांशी याबाबत चर्चा सुरु आहे. 

मोठी बातमी : तब्बल १९ तासानंतर चिमुकल्या मोहम्मदला NDRF ने काढलं ढिगाऱ्याबाहेर आणि सर्वांनी म्हटलं गणपती बाप्पा मोरया

तिकिटाचे दर कमी आहेत. डिझेलचा भाव वाढला असून, अन्य खर्च देखील असतो. अगोदरच परिवहन सेवा तोट्यात आहे. त्यात लॉकडाऊनमुळे आर्थिक ताण निर्माण झाला आहे. सरकारने निश्‍चित केलेल्या दराप्रमाणे आकारणी करण्याची परवानगी मिळावी. तसेच महापालिका प्रशासन व सरकारने मदत करावी. परिवहन सेवेचे उत्पन्न व खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने परिवहन सेवा चालवू शकत नाही. 
- मनोहर सकपाळ, संचालक, भगीरथ ट्रान्सपोर्ट परिवहन सेवा. 

पालिका परिवहन सेवेतील कामगारांबाबत सर्वस्वी जबाबदारी ही भगीरथ ट्रान्सपोर्टची आहे. महापालिकेने तसा करार केला आहे. सध्या बस अत्यावश्‍यक सेवेसाठी सुरु असून, सरकारच्या नियमानुसार परिवहन सेवा पुन्हा मार्गावर धावतील. 
- प्रितेश पाटील, सभापती, परिवहन विभाग, वसई-विरार महापालिका 

(संपादन : वैभव गाटे)

corona hits Vasai Virar transport more than 700 employees without pay

loading image
go to top