esakal | तब्बल १९ तासानंतर चिमुकल्या मोहम्मदला NDRF ने काढलं ढिगाऱ्याबाहेर आणि सर्वांनी म्हटलं गणपती बाप्पा मोरया
sakal

बोलून बातमी शोधा

तब्बल १९ तासानंतर चिमुकल्या मोहम्मदला NDRF ने काढलं ढिगाऱ्याबाहेर आणि सर्वांनी म्हटलं गणपती बाप्पा मोरया

तब्बल १९ तासानंतर या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून एका मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात NDRF च्या टीमला यश आलंय.

तब्बल १९ तासानंतर चिमुकल्या मोहम्मदला NDRF ने काढलं ढिगाऱ्याबाहेर आणि सर्वांनी म्हटलं गणपती बाप्पा मोरया

sakal_logo
By
सुमित बागुल

महाड : महाडमध्ये बिल्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवलाय. काल दुर्घटना झाल्यानंतर आजही, म्हणजेच तब्बल १९ ते २० तासांनंतर महाडमध्ये कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा उपासण्याचं काम युद्ध सुरु आहे. या घटनास्थळी कालपासून चर्चा होती ती ढिगाऱ्यात अडकलेल्या तिघा चिमुरड्यांची. या तिघा चिमुरड्यांचं या बिल्डिंग दुर्घटनेत काय झालं असेल अशी चर्चा सर्वच करत होते. यानंतर आज पहिली आनंदाचो बातमी समोर आली.   

हेही वाचा : इमारत थरथरत असतानाही त्याने १५ जणांचा वाचवला जीव, महाड दुर्घटनेतील हिरोची कहाणी...

तब्बल १९ तासानंतर या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून एका मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात NDRF च्या टीमला यश आलंय. इमारतीमधून बाहेर काढताना हा मुलगा सुखरूप असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे तब्बल १९ तासांनी आता एका लागण मुलाला इमारतीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढल्याने आनंद व्यक्त केला जातोय.  या लहान मुलाला ढिगाऱ्यातून बाहेर काढल्यानंतर तिथे उपस्थितांनी मोठ्याने टाळ्या वाजवल्यात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देखील दिल्यात. NDRF च्या पथकाने मेहनत घेऊन या लहानग्याला बाहेर काढलंय. 

हेही वाचा :  अफलातून! तब्बल २६ वर्षांनी सापडली ट्रेनमध्ये चोरीला गेलेली सोनसाखळी

या लहान मुलाचं नाव मोहम्मद पडल्याची माहिती समजतेय. दरम्यान मोहम्मद जरी वाचला असला तरीही त्याची आई आणि त्याची इतर भावंडं अजूनही ढिगाऱ्याखाली अडकली असल्याची भीती मोहम्मदच्या आत्त्याने टीव्ही माध्यमांना दिली आहे. मोहम्मदला आता पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. लहानग्या मोहम्मदची प्रकृती चांगली असल्याचंही डॉक्टरांकडून समजतंय. चिमुरड्या मोहम्मदच्या अंगावर काही ठिकाणी खरचटल्याच्या जखमा आहेत मात्र त्याची प्रकृती चांगली असल्याचं समजतंय. 

after nineteen long hours child named mohammd rescued from mahad building derrieres

loading image
go to top