esakal | #BMC च्या अर्थसंकल्पालाही "कोरोना" करंट

बोलून बातमी शोधा

#BMC च्या अर्थसंकल्पालाही "कोरोना" करंट
#BMC च्या अर्थसंकल्पालाही "कोरोना" करंट
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावरही कोरोनाचे सावट आहे. मंगळवारी (ता. 17) होणाऱ्या पालिका सभागृहात नगरसेवक किंवा गटनेत्यांना बोलू न देता थेट ठराव मांडून अर्थसंकल्प मंजूर केला जाणार असल्याचे समजते. 

कोणत्या वातावरणात कोरोना व्हायरस बनतो राक्षस?

राज्यासह मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे लक्षात घेऊन सरकारने मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, राणीबाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने मुंबईत जमावबंदी करण्यात आली आहे. सभा, आंदोलने, रॅली असे विविध कार्यक्रमही होणार नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चा न करता तो मंजूर केला जाणार आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मुंबई महापालिकेचा सन 2020-21 वर्षाचा 33 हजार 441 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये 640 कोटी रुपयांचा अंतर्गत फेरबदल करत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी महापालिका सभागृहात मांडला. 

मुंबईच्या बातम्या पाहण्यासाठी इथे क्लिक करा

नगरसेवकांचा हिरमोड 
गेल्या शुक्रवारी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या भाषणाने पालिकेच्या अर्थसंकल्पीय चर्चेला सुरुवात झाली आहे. सोमवारपासून नगरसेवकांच्या भाषणाला सुरुवात केली जाणार होती. मात्र ही सभा रद्द करून मंगळवारी आयोजित करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नगरसेवकांना अर्थसंकल्पावरील भाषणासाठी परवानगी न देता थेट ठराव मांडून अर्थसंकल्प मंजूर केला जाणार आहे. दरम्यान, नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर भाषण करण्यासाठी तयारी केली होती; मात्र कोरोनामुळे नगरसेवकांना अर्थसंकल्पावर बोलता येणार नसल्याने नगरसेवकांचा हिरमोड झाला आहे. 

Corona Impact on BMC Budget