esakal | कोरोना मृतदेहाच्या राखेतून संसर्ग होतो का? काय माहिती आली समोर, वाचा वृत्त
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना मृतदेहाच्या राखेतून संसर्ग होतो का? काय माहिती आली समोर, वाचा वृत्त

कोरोनाची धास्ती अनेकांना चांगलीच बसली आहे. कोरोना झालेल्या व्यक्तींचे निधन झाल्यानंतर त्यांची रक्षा विसर्जन करण्यासही नातेवाईक तयार नाहीत, असेच चित्र दिसत आहे. या रक्षेतून कोरोनाची लागण होत नाही हे सिद्ध झाल्यानंतरही नातेवाईक येत नसल्याचे चित्र आहे.

कोरोना मृतदेहाच्या राखेतून संसर्ग होतो का? काय माहिती आली समोर, वाचा वृत्त

sakal_logo
By
संजयघारपुरे

मुंबई ः कोरोनाची धास्ती अनेकांना चांगलीच बसली आहे. कोरोना झालेल्या व्यक्तींचे निधन झाल्यानंतर त्यांची रक्षा विसर्जन करण्यासही नातेवाईक तयार नाहीत, असेच चित्र दिसत आहे. या रक्षेतून कोरोनाची लागण होत नाही हे सिद्ध झाल्यानंतरही नातेवाईक येत नसल्याचे चित्र आहे.

मोदींवर गोध्रा, शहांवर सोहारुबुद्दीन-लोहिया खटल्याचे आरोप; आदित्य ठाकरेंची इमेज खराब करण्याचा प्रयत्न

गोरेगाव येथील शिवधाम स्मशानभूमीत कोरोनामुळे निधन झाल्यावर अंत्यसंस्कार झाल्यावर रक्षा घेण्यास येणाऱ्यांचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी आहे. दहातील चार ते फार तर पाच जण येतात. आम्ही त्यांना फोन करुन बोलावतो, पण ते येण्यास तयार नसतात. अनेक जण आम्हाला तुम्हीच विसर्जन करा असे सांगतात. त्यांना आपल्याला कोरोनाची लागण होईल, अशी भिती वाटत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. कोरोनामुळे निधन झालेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार होताना असलेल्यांना चौदा दिवसांचे विलगीकरण आवश्यक आहे. त्यामुळे ते स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना रक्षा ठेवण्यास सांगतात. कर्मचारीही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन साह्य करीत आहेत. यापूर्वी त्याच दिवशी रक्षा घेऊन जाण्याचा नियम होता. 

महामुंबईत आज दिवसभर पावसाचे थैमान; बहुतांश भाग पाण्याखाली; रेड अलर्ट कायम 

चकाला येथील मुक्तीधाममध्ये फार वेगळी परिस्थिती नाही. सुरुवातीच्या काही अनुभवामुळे आम्हीच नातेवाईकांना रक्षा गोळा करण्यासाठी येणार का अशी विचारणा करतो. अर्थात अनेक जण येणार असल्याचे सांगतात, पण त्यातील अनेक जण येत नाहीत. अनेकांना यामुळे आपल्याला कोरोनाची लागण होईल, अशी भिती वाटत असल्याचे येथील आधिकाऱ्यांनी सांगितले. रक्षा विसर्जनासाठी आता नाशिकला जाणाऱ्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर घट झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

-------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )