कोरोनामुळे मेट्रो 3 च्या खर्चात वाढ; 108 कोटींनी वाढला खर्च | Metro project | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Metro

कोरोनामुळे मेट्रो 3 च्या खर्चात वाढ; 108 कोटींनी वाढला खर्च

sakal_logo
By
- तेजस वाघमारे

मुंबई : कोरोना महामारीमुळे (corona infection) लागू केलेल्या लॉकडाऊनचा फटका (lockdown impact) कुलाबा वांद्रे सिप्ज या मेट्रो 3 प्रकल्पालाही (Metro three project) बसला आहे. लॉकडाउनच्या काळात कर्मचारी आणि स्थापत्य कामांचा खर्च तब्बल 108 कोटींनी वाढला (expenses increases) असल्याचे माहिती अधिकारातून (RTI information) उघड झाली आहे.

हेही वाचा: Share Market update : सेन्सेक्स 454 अंश वाढला

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRCL) मार्फत मेट्रो 3 प्रकल्प राबविण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मेट्रो प्रकल्पाचे काम करणारे कामगार आपल्या मूळ गावी परत गेले होते. यामुळे प्रकल्पाचे कामेही थांबले होते. कामे रखडल्याने एमएमआरसीएलने 23 मार्च 2020 ते 22 सप्टेंबर 2020 या काळातील कामाला मुदतवाढ दिली.

त्यामुळे भुयारी कामाच्या वाढलेल्या खर्चापोटी कंत्राटदाराला अतिरिक्त 87 कोटी रुपये कंपनीला मोजावे लागले आहेत. तर कामगारांवरील खर्चापोटी कंत्राटदाराला अतिरिक्त 20 कोटी 91 लाख रुपये द्यावे लागले आहेत. कोरोनाच्या या सहा महिन्यांच्या काळात स्थापत्य कामे आणि मजूरांच्या पगारापोटी एमएमआरसीएलला अतिरिक्त 107 कोटी 91 लाख रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला असल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते निकोलस अल्मेडा यांनी कंपनीने दिली आहे.

loading image
go to top