esakal | BMC : मुंबईतील 80 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine

BMC : मुंबईतील 80 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईतील (Mumbai) 80 टक्के नागरिकांचा पहिला डोस (Corona first vaccine) पूर्ण झाला असून जवळपास 30 टक्के नागरिकांनी दुसरा डोस (Second dose) घेतला आहे. म्हणजेच आतापर्यंत 30 टक्के नागरिकांना कोरोनापासून (corona) संरक्षण मिळाले आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण लोकसंख्येपैकी 73 लाख 41 हजार 372 नागरिकांनी पहिला डोस घेतला असून दुसरा डोस 30 टक्के म्हणजेच 30 लाख 15 हजार 700 नागरिकांचा (People vaccination) झाला आहे. दरम्यान, 91 लाख 21 हजार 808 नागरिकांचे लसीकरण अजून बाकी आहेत.  म्हणजेच अजूनही दुसऱ्या डोससाठी 70 टक्के लोकसंख्या बाकी आहे.

हेही वाचा: इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी जिओबीपी व ब्ल्यूस्मार्टचे सहकार्य

दरम्यान, पालिकेला गेल्या तीन महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीच्या 6 दिवसांत सर्वाधिक लसींचा पुरवठा राज्यातर्फे करण्यात आला आहे. ज्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग गेल्या काही दिवसांपासून वाढलेला दिसतो असे मत मुंबई जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. शीला जगताप यांनी व्यक्त केले आहे. डॉ. शीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिकेला सप्टेंबर महिन्याच्या 6 तारखेपर्यंत सर्वाधिक  डोस उपलब्ध झाले आहेत. पावणे पाच लाख डोस पुरवले गेले असून याचा फायदा लसीकरणाचा वेग वाढण्यास झाला आहे.

राज्याकडून कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्डचे मिळून 63 लाख डोस उपलब्ध झाले आहेत. तर, त्यापैकी जवळपास पावणे पाच लाख हे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळाले आहेत. जुलै महिन्यात 9 लाख 83 हजार डोस मिळाले, ऑगस्ट महिन्यात 9 लाख 86 हजार डोस मिळाले पण, हे प्रमाण आता वाढले असून फक्त 6 सप्टेंबरपर्यंत 4 लाख 77 हजार डोस मिळाले आहेत. लस पुरवठा अशाच पद्धतीने सुरू राहिला तर लसीकरणाचा वेग वाढेल आणि उद्दिष्ट लवकर गाठण्यास सोपे होईल असेही डॉ. जगताप यांनी सांगितले.

दुसऱ्या डोसमध्ये 45 वर्षांवरील अधिक

45 वर्षांवरील 73 टक्के नागरिकांचा पहिला डोस आणि दुसरा डोस 47 टक्के नागरिकांचा झाला आहे. 1 मार्चपासून 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्याने या वयोगटात दुसरा डोस घेण्याचे प्रमाण जास्त आहे. तर, दुसरा डोस घेण्यात सर्वात कमी प्रमाण हे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे आहे.

loading image
go to top