...अन् मुलुंडचे वृध्दाश्रम हादरले! 21 जणांना कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 May 2020

मुलुंडमधील ओल्ड एज होम या वृध्दाश्रमात 21 जणांना कोरोनाची लागण झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे.  वृध्दाश्रमातील 18 ज्येष्ठ नागरिक, 2 परिचारिका आणि एक डाॅक्टर पाॅझिटिव्ह आढळले आहेत. 

मुलुंड : मुलुंडमधील ओल्ड एज होम या वृध्दाश्रमात 21 जणांना कोरोनाची लागण झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे.  वृध्दाश्रमातील 18 ज्येष्ठ नागरिक, 2 परिचारिका आणि एक डाॅक्टर पाॅझिटिव्ह आढळले आहेत. 

ही बातमी वाचली का? कोरोना लढ्यात भारतावर मोठी जबाबदारी; डॉ. हर्षवर्धन डब्ल्यूएचओ कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी 

वृध्दाश्रमातील बहुतेक सदस्य 75 व त्याहून अधिक वयोगटाचे आहेत. 8 सदस्य 90 वर्षांहून अधिक वयाचे आहेत. वृध्दांना कोरोनाचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे वृध्दाश्रमात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंतेचे वातावरण आहे. आश्रमातील इतर वृध्दांनाही कोरोनाचा धोका होण्याची शक्यता यामुळे वाढली आहे. बाधित वृध्दांना मुंबईतील नायर आणि केईएम रुग्णालयात दाखल केले आहे. 

ही बातमी वाचली का? एमएचटी-सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर; असे असेल वेळापत्रक!

वृध्दाश्रमातील ज्या सदस्यांची चाचणी नकारात्मक आली आहे त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे पाठविण्यात आले आहे; तर काहींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याचे टी विभागाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infiltration into an old age home in Mulund; 21 infected