कोरोना लढ्यात भारतावर मोठी जबाबदारी; डॉ. हर्षवर्धन डब्ल्यूएचओ कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 May 2020

कोरोना महामारीच्या काळात भारतावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) कार्यकारी मंडळ अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात भारतावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) कार्यकारी मंडळ अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

ही बातमी वाचली का? चर्चगेट येथील सनदी अधिकाऱ्यांची इमारत सील

जागतिक आरोग्य संघटनेत 194 देशांचा सहभाग आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत डॉ. हर्ष वर्धन यांची कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. ते जपानच्या डॉ. हिरोकी नाकतानी यांची जागा घेतील. डॉ. हर्ष वर्धन शुक्रवारी (ता. 22) पदभार स्वीकारतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या पदाचा कार्यकाळ एक वर्षाचा आहे. यापूर्वी डब्ल्यूएचओच्या दक्षिण-पूर्व आशिया समूहाने भारताला तीन वर्षांसाठी कार्यकारी मंडळाचे सदस्यत्व देण्यास मान्यता दिली होती. 

ही बातमी वाचली का? मुंबईतील लोकवस्त्या हहोतायेत सुन्या-सुन्या, बेरोजगारीमुळे स्थलांतर वाढले

कार्यकारी मंडळाचे धोरण आणि निर्णयांची जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांत अंमलबजावणी करण्याची जबाबदारी डॉ. हर्ष वर्धन यांच्यावर असेल. कोव्हिड-19 विरोधात भारतात सुरू असलेल्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावत असल्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Great responsibility on India in the Corona fight; Dr. Harshvardhan as the President of WHO