"कोरोना संपलेला नाही! दहिहंडी जल्लोषात अन् काळजी घेऊन साजरी करा" - CM शिंदे

ठाण्यातील टेंभीनाका दहिहंडी उत्सावत मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली, यावेळी ते बोलत होते.
eknath shinde
eknath shinde
Updated on

मुंबई : राज्यात सर्वत्र दहिहंडीचा उत्सव उत्साहात साजरा होत आहे. दोन वर्षानंतर यंदा हा उत्सव पुन्हा पूर्वीप्रमाणं साजरा होतोय. पण कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळं सर्व उत्सव जल्लोषात साजरे करा अन् काळजी पण घ्या, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला केलं आहे. ठाण्यातील टेंभीनाका मित्र मंडळाच्या दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केलं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि सिनेअभिनेत्री श्रद्धा कपूरही उपस्थित होते. (Corona is not over Celebrate Dahihandi with joy and care appeal to CM Eknath Shinde)

eknath shinde
आमचं तरुणाईचं सरकार, जन्माष्ठमीचा दिवस तुम्हाला समर्पित - देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री म्हणाले, सरकार हे तुमच्या सर्वांचं आहे, शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं, कामगारांच आणि गोविंदाच देखील. गोविंदाच्या या सणाला आपण सार्वजनिक सुटी देऊन टाकली आहे. तसेच दुसरीकडे गोविंदांना दुर्देवानं काही झालं तर १० लाखांचं विमाकवचही घोषीत केलं आहे. तसेच प्रो कबड्डी प्रमाणं आता प्रो गोविंदा पुढच्या वर्षापासून सुरु होईल. तसेच क्रीडामध्ये ५ टक्के आरक्षणही लागू होईल.

eknath shinde
NITI आयोगाची सेन्सॉरशीप! वर्तमानपत्रांमध्ये लेख छापण्यापूर्वी तपासणं बंधनकारक

हा टेंभीनाका गोविंदांची पंढरी आहे. यावर्षी श्रद्धा कपूर यांनी या उत्सवात हजेरी लावली. दरवर्षी असे कलावंत आनंद दिघे यांच्या दहीहंडीचा मान वाढवत असतात. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केला हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात फोफवला आहे. मुंबईतला प्रत्येक गोविंदा या टेंभीनाक्याला सलामी देऊन पुढे जातो. आपल्या गोविंदाची सुरुवात करतो हा आपला इतिहास आणि परंपरा आहे. आपली संस्कृती वाढवण्याचं काम आनंद दिघेंनी केलं. दिघेंच्या पुण्याईमुळं गणशोत्सव आणि दहीहंडी सुरु झाली.

उत्सवांवरील मर्यादा वैगरे बस झालं

हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे. या सरकारमधून सर्वांना न्याय देण्याचं काम केरणार आहे. त्यामुळं सर्वांना सांगू इच्छितो की जल्लोषात आणि काळजी घेऊन उत्सव साजरे करा. कोराना अजून संपलेला नाही. त्यामुळं संशय आला, किंवा लक्षणं वाटली तर आपली तपासणी करुन घ्या. कोविड, स्वाईन फ्लू आणि डेंग्यू याचा देखील फैलाव होतोय त्यामुळं काळजी घेणं गरजेचं आहे. मर्यादा वैगेरे बस झाले दोन अडीच वर्षे आपण हे पाळलं. त्यामुळं आपण गणेशोत्सावातील नियम-अटी शिथील केल्या, सर्व परवानग्यांचे पैसे माफ केले. राज्यात सर्वांच्या जीवनात चांगलं जीवन आणण्याचा प्रयत्न हे सरकार करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com