मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या ३५३ नव्या रुग्णांची भर; २ जणांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या ३५३ नव्या रुग्णांची भर; २ जणांचा मृत्यू

मुंबई : आज दिवसभरात कोरोनाच्या मृतांचा आकडा (corona deaths) कमी झाला असून 5 वरून 2 पर्यंत खाली आला आहे. त्यामुळे मुंबईतील (Mumbai) मृतांचा एकूण आकडा 16 हजार वर पोहोचला आहे. आज मृत्यू कमी झाल्याने मुंबईतील आजचा मृत्युदर 0.56 टक्के आहे. आज नवीन रुग्णांचा (corona new patients) आकडा ही काहीसा कमी झाला असून आज 353 नवीन रुग्णांची नोंद झाली.

हेही वाचा: कोकणात जाणाऱ्यांना दिलासा; 'RTPCR' ची बंधने हटवली

आज नोंद झालेल्या मृतांपैकी दोन्ही पुरुष होते तर त्यातील एका रुग्णाला दुर्घकालीन आजार होता.दोन्ही मृतांचे वय 60 वयोगटाच्या वर होते. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,47,078 वर पोहोचली आहे. तर दरम्यान, दिवसभरात बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढला असून 404 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,24,898 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.त्यामुळे मुंबईत सध्या 3,718 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान आज 38,484 चाचण्या झाल्या असून पॉझिटिव्हीटी दर 1.15 टक्के इतका आहे. आतापर्यंत 95,03,020 एवढ्या झाल्या आहेत. बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.06 टक्के आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 1266 दिवस असा आहे.

धारावीत पुन्हा शून्य रुग्णांची नोंद

धारावीत आज पुन्हा एकदा शून्य रुग्णांची नोंद झाली. धारावीत कोरोना काळातील ही सोळावी नोंद असून एकूण रुग्णसंख्या 7034 इतकी झाली आहे. सक्रिय रुग्ण 10 असून आतापर्यंत 6613 रुग्ण बरे झाले आहेत. दादर मध्ये आज 4 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 10068 झाले आहेत. दादर मध्ये 92 सक्रिय रुग्ण असून एकूण 9678 रुग्ण बरे झाले आहेत. तर माहीम मध्ये आज 13 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 10420 झाली आहे. 143 सक्रिय रुग्ण असून 10016 रुग्ण बरे झाले आहेत.जी उत्तर मध्ये आज 17 रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांचा आकडा 27,522 वर पोचला आहे.

Web Title: Corona Mumbai Corona Update Corona New Patient Corona Deaths Corona Test

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..