esakal | कोकणात जाणाऱ्यांना दिलासा; 'RTPCR' ची बंधने हटवली
sakal

बोलून बातमी शोधा

 konkan

कोकणात जाणाऱ्यांना दिलासा; 'RTPCR' ची बंधने हटवली

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त (Ganpati Festival) कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे कोरोना लसीचे दोन डोस (corona vaccination) नसतील तर, त्यांना आरटीपीसीआर चाचणी (RTPCR) बंधनकारक केली होती. मात्र, याविरोधात कोकणवासियांकडून आंदोलन (Strike) केल्यानंतर कोकणात जाण्यासाठी 72 तासांअगोदर आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्राची (certificate) आवश्यकता भासणार नाही. तर, मुंबई, पुण्याहून गणेशभक्तांची रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर वाहतूककोंडी (traffic jam) होऊ नये, यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर कोणतीही चाचणी (no test) होणार नाही. फक्त गावपातळीवर आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी गृहभेट देऊन प्राथमिक आरोग्य चाचणी केली जाणार आहे.

हेही वाचा: खराब रस्त्यांमुळे अपघात झाला तर चालक दोषी नाही - न्यायालय

गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे रस्ते मार्गाने, रेल्वे मार्गावरून येणाऱ्यांची संख्या अधिक असते. परिणामी, वाहतूक कोंडी व गर्दी होऊ नये, यासाठी मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांची कोणत्याही चेकपोस्टवर कोरोना चाचणीसाठी अडवणूक केली जाणार नाही. फक्त ग्रामपातळीवर प्राथमिक चाचणी होईल. यामध्ये कोणावरही सक्ती करण्यात येणार नाही. तर, 18 वर्षाखालील मुलांना देखील कोणत्याही प्रकारची बंधने नसून कोकणात विना व्यत्यय प्रवेश मिळेल. गणेशभक्तांनी कोरोना नियमांचे, व्यवस्थित मास्कचा वापर करण्याचे असे आदेश रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून दिले आहेत.

तर, गाव पातळीवर प्राथमिक आरोग्य चाचणी करतेवेळी कोरोनाची लक्षणे असलेल्यांना विलगीकरण कक्षात दाखल केले जावे, अशा सूचना रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत.कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना एनवेळी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केल्याची नियमावली लागू करण्यात आली. त्यामुळे ज्या चाकरमान्यांचे दोन डोस घेतले नव्हते, त्यांना आरटीपीसीआर करावी लागणार होती. याविरोधात कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाच्यावतीने ठाण्यात आंदोलन करण्यात आले. आंदोलन करण्याच्याआधी संघाच्या पदाधिकाऱ्यांना रेल्वे पोलिसांकडून नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या.

हेही वाचा: पनवेल परिसरात गणेशमूर्तींची होम डिलिव्हरी; उपक्रमाचे भक्तांकडून स्वागत

मात्र, तरी देखील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी गांधीगिरी पद्धतीने सोमवारी, (ता.6) रोजी ठाण्यात आंदोलन केले. यावेळी रेल्वे रोको करण्याएवजी लांब पल्ल्याच्या गाडीच्या लोको पायलटला पुष्पगुच्छ देऊन आंदोलन करण्यात आले. रेल्वे स्थानकात आंदोलन केल्यानंतर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आरटीपीसीआर चाचणीचे बंधन प्रशासनाने रद्द केले आहे. फक्त गाव पातळीवर प्राथमिक चाचणी केली जाईल. यामध्ये देखील कोणतीही सक्ती केली जाणार नाही, अशी माहिती कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे प्रमुख राजू कांबळे यांनी दिली.

loading image
go to top