मुंबईत कोरोनाचा कहर थांबेना! आज 2,085 रुग्णांची भर; वाचा इतर सविस्तर आकडेवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत कोरोनाचा कहर थांबेना! आज 2,085 रुग्णांची भर; वाचा इतर सविस्तर आकडेवारी

मुंबईत आजही बाधित रुग्णांचा आकडा वाढला असून, नव्याने 2,085 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,69,693 झाली आहे.

मुंबईत कोरोनाचा कहर थांबेना! आज 2,085 रुग्णांची भर; वाचा इतर सविस्तर आकडेवारी

मुंबई : मुंबईत आजही बाधित रुग्णांचा आकडा वाढला असून, नव्याने 2,085 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,69,693 झाली आहे. रुग्णवाढीचा दरही 1.21 वरून 1.24 टक्क्यावर पोहोचला आहे. आज दिवसभरात 41 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा 8,147 वर पोहोचला आहे. तर 902 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली असून रुग्ण बरे होण्याचा दर हा 77 टक्के इतका आहे.

एका तोळ्याच्या सोनसाखळीसाठी मित्राची हत्या; गुन्हेगाराला 24 तासांत अटक - 

मुंबईत आज नोंद झालेल्या 41 मृत्यूंपैकी 27 जणांना दीर्घकालीन आजार होते. मृत व्यक्तींमध्ये 21 पुरुष, तर 11 महिलांचा समावेश आहे. 41 रुग्णांपैकी 32 रुग्णांचे वय 60 वर्षांवर होते, तर नऊ रुग्ण 40 ते 60 वर्षांदरम्यान होते. आज 902 रुग्ण बरे झाले असून, आजपर्यंत 1,30,918 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 56 दिवसांवर गेला आहे. 12 सप्टेंबरपर्यंत एकूण 9,15,789  कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या, तर 6 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान कोव्हिड रुग्णवाढीच्या दरात वाढ होऊन तो 1.24 इतका झाला आहे. 

सुशांतसिंग मृत्यूप्रकरण! बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी अलिशान कारमधून ड्रग्जची तस्करी 

अति जोखमीचे 14,449 रुग्ण 
मुंबईत 555 इमारती आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केलेले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 7,983 असून, गेल्या 24 तासांत बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 14,449 अति जोखमीचे रुग्ण आहेत, तर 2,335 रुग्ण कोव्हिड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Web Title: Corona Mumbai Today 2085 Patients Added

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top