esakal | डहाणूत मालगाडीचा डबा घसरला
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

डहाणूत मालगाडीचा डबा घसरला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

डहाणू : पश्चिम रेल्वेवरील डहाणू येथे मालगाडीचा एक डबा रेल्वे रुळावरून घसरला. आज सकाळी ९.५० वाजता पश्चिम रेल्वेच्या डहाणू यार्ड येथे ही घटना घडली. यामध्ये जीवितहानी झाली नाही. डबे रिकामे असल्याने जास्त नुकसान झाले नसल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.
डहाणूतील थर्मल प्लांटमधून सकाळी मालगाडी येत होती.

हेही वाचा: डहाणू-पनवेल मेमू सोमवारपासून सुरू

गाडी डहाणू यार्ड येथे आली असता एक डबा रेल्वे रुळावरून घसरला. या अपघातामुळे लोकल सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाने सांगितले. घटनेची माहिती मिळताच सकाळी ९.५५ वाजता अभियांत्रिकी पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी घसरलेल्या डब्याची पाहणी केली. त्यानंतर डबा रेल्वे रुळावरून बाजूला काढण्याचे आणि रूळ दुरुस्ती सुरू झाली. अपघातामध्ये जीवितहानी झाली नसली तरी याबाबतची चौकशी केली जात आहे, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाने सांगितले.

loading image
go to top