esakal | दादर फूल बाजारात झुंबड; दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी, कोरोनाचे भय हरवले | Corona
sakal

बोलून बातमी शोधा

Flowers market

दादर फूल बाजारात झुंबड; दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी, कोरोनाचे भय हरवले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिवडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (corona) यंदा गरबा खेळण्यावर बंदी (garba restrictions) असली तरी अनेक मंडळांत कोरोनाचे नियम (corona rules) पाळत नवरात्रोत्सव साजरा (navratri festival) करण्यात येत आहे. शुक्रवारी (ता.१५) दसरा असल्याने फुले, तोरे आणि आपट्यांच्या पानांची खरेदी (flowers purchasing) करण्यासाठी दादर फूल बाजारात (dadar market) कोरोनाला न जुमानता ग्राहकांची झुंबड (consumer) उडाली होती.

हेही वाचा: वाडा : लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार

दसऱ्याला झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असल्याने पिवळ्या व केशरी रंगाच्या या फुलांची जास्त चलती आहे. ६० ते ८० रुपये किलो दराने मिळणारा झेंडू सध्या १०० ते १४० रुपये प्रतिकिलो आहे. गोंडा व आंब्याच्या पानांचे तयार तोरण ६० ते ८० रुपये प्रतिमीटरने विक्री करण्यात येत असल्याचे फूलविक्रेते प्रकाश दिवे यांनी सांगितले.

दादर पश्चिम येथील कविवर्य केशवसुत उड्डाणपुलाखालील स्थानकालगत असलेल्या फूल बाजारात झेंडूची फूले, तोरणे, आपट्याची पाने, आंब्याची पाने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दी मध्ये कोरोनाचे भय मात्र हरवल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे.

झेंडू १४० रुपये

या वर्षी किरकोळ विक्रीत झेंडूचा भाव १०० ते १४० रुपयांपर्यंत पोहोचला असून शेवंती १६० ते १८० रुपये, लहान झेंडू ९० ते ११० रुपये, गुलछडी ३७० ते ४०० रुपये प्रतिकिलो आहे. तसेच तयार हार १० रुपयांनी महागले असून झेंडूच्या एका तोरणाची किंमत प्रतिमिटर ६० ते ८० रुपयांपर्यंत आहे. आंब्याच्या व आपट्याच्या पानाच्या एका जुडीची किंमत १० ते २० रुपये इतकी असल्याचे फूलविक्रेते ललित कारेकर यांनी सांगितले.

loading image
go to top