esakal | वाडा : लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार | wada
sakal

बोलून बातमी शोधा

Woman molestation

वाडा : लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाडा : जव्हार येथील एका तरुणीला लग्नाचे प्रलोभन (marriage promise) दाखवून तिच्यावर अत्याचार (woman molestation) करणाऱ्या आरोपीविरोधात वाडा पोलीस ठाण्यात (wada police station) गुन्हा दाखल (police FIR) करण्यात आला आहे.

हेही वाचा: नवी मुंबई : पालिका कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी आनंदात

जव्हार तालुक्यातील जांबुळमाया गावातील तरुणी शेतीकामासाठी गातेस खुर्द येथे २०१६ सालापासून शेतमजूर म्हणून येते. येथीलच सागर पाटील यांच्याकडे सदर तरुणी अनेक वर्षांपासून कामाला आहे. दरम्यान, सागर आणि सदर तरुणीमध्ये ओळख निर्माण झाली.

त्याचाच गैरफायदा घेत सागरने तरुणीला लग्नाचे प्रलोभन दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तरुणीने लग्नाबाबत सागरला विचारता त्याने नकार दिला. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने वाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी सागर पाटील विरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास उपविभागीय अधिकारी प्रशांत परदेशी करत आहेत.

loading image
go to top