कोविड लसीच्या नावावर ज्येष्ठ नागरिकाला १३ लाखांचा गंडा; दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Culprit arrested

कोविड लसीच्या नावावर ज्येष्ठ नागरिकाला १३ लाखांचा गंडा; दोघांना अटक

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोविडच्या नावानं (corona) आत्तापर्यंत अनेकांनी लोकांना लुबाडून पैसे कमवलेत. हे लोन आता ऑनलाईन फ्रॉडपर्यंत (online fraud) जाऊन पोहोचलंय. कोविड व्हॅक्सिनसाठी (corona vaccine) कच्चा माल (raw material ) पाठवणारा एजन्ट (Agent) हवाय असं सांगत एका ज्येष्ठ नागरिकाला 13 लाखाला गंडा (thirteen lac money fraud) घालणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांच्या (Mumbai police) सायबर क्राईम ब्रांचनं (cyber crime branch) अटक केलीय. यात एका नायजेरियन व्यक्तीचा समावेश आहे.

हेही वाचा: फरार...! परमबीर सिंगाच्या घरावरचा आदेश वाचला का?

यातील तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. आरोपींनी ई मेल आणि मोबाईलवरुन आरोपींनी त्यांना संपर्क केला. आमची लंडन इथं ionic pharmaceutical and manufacturing नावाची कंपनी असुन आम्ही कोविडची लस बनवतो, त्यासाठी आम्हाला भारतातून 'फायजोन डायजेस्ट' नावाचा कच्चा माल खरेदी करायचाय आणि त्यासाठी एजन्टची गरज आहे असं संगितलं. तसंच कच्चा माल पुरवणाऱ्या एजंटला 60 टक्के कमिशन देणार असं अमिषही दाखवलं. तक्रारदारानं कच्चा माल पुरवावा यासाठी त्यांनी अनेक कारणं सांगून विश्वास संपादन केला. तक्रारदार कच्चा माल पुरवायला तयार झाल्यावर आरोपींनी वेगवेगळी कारणं सांगून त्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये तक्रारदाराला जवळपास 13 लाख रुपये ट्रान्सफर करायला सांगितलं.

त्यानंतर त्यांच्याशी काहीच संपर्क होत नसल्यानं आपली फसवणूक झाल्याचं तक्रारदाराच्या लक्षात आलं. तक्रार दाखल झाल्यानंतर मुंबईच्या सायबर क्राईम विभागतले वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय गोविलकर, पोलीस निरीक्षक राहुल खटावकर, आणि पोलीस उपनिरीक्षक निलेश हेंबाडे यांनी सर्व तांत्रिक बाबी तपासल्या. त्यातुन आरोपी हे नवि मुंबईत वास्तव्यास असल्याचं त्यांना समजलं, त्यानुसार कारवाई करत दोन आरोपींना पनवेल पोलिस आणि खारघर पोलिसांज्या मदतीनं अटक करण्यात आली आहे. यात एक नायजेरीय नागरीक आहे. त्यानं त्याच्या ओळखीसाठी दिलेला पासपोर्टही बनावट असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय.

आरोपींकडून 10 मोबाईल, 2 सिमकार्ड, एक पासपोर्ट आणि एक वही जप्त करण्यात आलीय. दोघावरही भा. द वि च्या कलम 419, 420467, 468, 471, 34, माहीती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66(क), 66(ड) तसंच विदेशी नागरीक कायद्याच्या कलम 14 आणि पासपोर्ट अॅक्ट अतर्गत गुनेहा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींनी आणखी अनेकांना फसवलं एसल्याची माहीती पलिस तपासात समोर आलीये.

loading image
go to top