esakal | प्रभादेवीतील पालिका शाळेत पहिली घंटा वाजली; विद्यार्थी सुखावले | Education update
sakal

बोलून बातमी शोधा

School

प्रभादेवीतील पालिका शाळेत पहिली घंटा वाजली; विद्यार्थी सुखावले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

प्रभादेवी : कोरोनामुळे (corona) गेले दीड वर्ष शाळा बंदच होती. ना मित्र भेटत होते, ना शिक्षक. अभ्यास होता तो फक्त ऑनलाईन (online study); मात्र आज प्रदीर्घ काळानंतर शाळेचे दर्शन घडले (school starts) आणि छान वाटले, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.
शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत आजपासून प्रभादेवी (prabhadevi school) येथील महापालिका शाळेत पहिली घंटा वाजली.

हेही वाचा: सदस्यांना प्रत्यक्ष हजेरी लावण्याची परवानगी का नाही? न्यायालयाचा सवाल

शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ एकेका विद्यार्थ्याचे शारीरिक तापमान तपासून, सॅनिटाईजेशन करून वर्गात सोडण्यात येत होते. त्यांना सोडायला आलेल्या पालकांचीदेखील शिक्षक आवर्जून विचारपूस करीत होते. विद्यार्थ्यांचे शाळेत आगमन होताच शिवसेनेचे स्थानिक शाखाप्रमुख संजय भगत यांनी शिक्षकांसह विद्यार्थ्यांची विचारपूस करत पुष्पगुच्छ आणि पेन देऊन त्यांचे स्वागत केले.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेप्रमाणे पालिका शाळेचे नूतनीकरण झाले होते. त्यामुळे शाळेचे रूपडेदेखील बदललेले होते. सुरुवातीलाच विद्यार्थी शाळेचे बदलेले सुंदर रूप पाहून अचंबित झाले. शाळेतील प्रत्येक बाकावर एक विद्यार्थी; तर शाळेतील बाथरूममध्ये साबण आणि हॅन्डवॉशची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थी शाळेतून गेल्यावर पुन्हा शाळा सॅनिटाईज करण्यात येणार असल्याचे प्रभादेवी मनपा शाळेचे मुख्यध्यापक निवास शेवाळे यांनी सांगितले. आरोग्याबाबत विद्यार्थ्यांची कोणतीही अडचण असल्यास आम्हालादेखील त्वरित कळवावे जेणेकरून विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता सर्वांनीच घेतली पाहिजे, असे संजय भगत यांनी सांगितले.

loading image
go to top