मुंबई अवयवदानात अव्वल ; यंदाची आकडेवारी जाणून घ्या सविस्तर

organ donation
organ donationsakal media

मुंबई : कोरोना काळात (corona) मंदावलेल्या अवयदानाला (organ donation) आता पुन्हा वेग प्राप्त झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी अवयव दानाला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत असून मुंबईत (Mumbai) यावर्षी 22 दात्यांनी (donators) केलेल्या दानातून 72 अवयव (organs) प्राप्त करण्यात आले. असे असले तरी मागणीच्या तुलनेत गरजू कैक पट अधिक असल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट झाले आहे.

मुंबईत यावर्षी अवयवदानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे गेल्या तीन दिवसातील अवयदानातून समोर येत आहे. मुंबईत सलग तीन दिवसांत चार अवयवदान करण्यात आले असल्याची माहिती अवयवदान आणि प्रत्यारोपण मुंबई विभागीय समितीकडून देण्यात आली आहे. यात 6 मूत्रपिंड, 4 यकृत, 1 हृदय, 1 फुफ्फुस, आणि हात असे अवयव आहेत. यातील दान करणाऱ्या कुटुंबीयांनी ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.

दरम्यान कोरोना काळात मृत देह ताब्यात घेण्याच्या मार्गदर्शक सूचना आणि सोशल डिस्टंसिंग, शिवाय महामारीचे नियम यामुळे कोरोना काळात अवयदान कमी संख्येने झाले असल्याचे मुंबई विभागीय अवयदान आणि प्रत्यारोपण समिती कडून सांगण्यात आले. मात्र सध्या निर्बंध सैल होत असल्याने अवयवदान पुन्हा जोमाने सुरु होईल आशा व्यक्त करण्यात आली.

organ donation
१५ ऑगस्टपासून धावणार डेक्कन क्वीन ; प्रवाशांसाठी आकर्षक विस्टाडोम कोच

झेडटीटीसी मुंबईकडे असणारी प्रतीक्षा यादी

मूत्रपिंड- 3325

यकृत -328

लहान आतडी- 7

स्वादुपिंड- 12

हृदय- 28

फुफ्फुसे- 9

हृदय आणि फुफ्फुसे- 6

हात- 5

जानेवारी 2021 पासून ते 12 ऑगस्ट 2021 पर्यंतचे अवयवदान

मूत्रपिंड - 32

यकृत - 20

स्वादुपिंड - 00

हृदय - 05

फुफ्फुस - 03

हात -01 (दुहेरी हात)

कॉर्निया - 06

त्वचा - 05

अस्थी दान -00.

अवयवदानात मुंबई अव्वल

मुंबईने राज्यालाही अवयवदानात मागे टाकले आहे. तर, अवयवदानात 2019 पासून महाराष्ट्र राज्य तामिळनाडूच्या ही पुढे आहे. दरम्यान, यावर्षी  आतापर्यंत एकूण 22 जणांचे अवयवदान करण्यात आले आहे.

2019 मध्ये सर्वाधिक अवयवदान

गेल्या सहा वर्षातील अवयवदान आकडेवारी पाहिल्यास सुरुवातीचे 2016 ते 2018 या तीन वर्षात अवयवदान मोहीम उभारी घेत असल्याचे दिसून येत आहे. तर, 2019 या वर्षात सर्वाधिक अवयदान झाले असल्याचे समोर आले. मुंबई विभागीय अवयदान व प्रत्यारोपण समितीच्या आकडेवारीनुसार 2019 या वर्षात सर्वाधिक अवयदान झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com