बालमजूर वाढण्याची भीती; ३० हजार विद्यार्थी अजूनही शाळेबाहेर | Corona pandemic | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

child labor

बालमजूर वाढण्याची भीती; ३० हजार विद्यार्थी अजूनही शाळेबाहेर

मुंबई : कोविड काळात (corona pandemic) रोजगार गमावलेल्या (unemployment) आई-वडिलांनी चार पैसे कमावण्यासाठी आपल्या शाळकरी मुलांनाही कामाला लावले (students doing job) आहे. त्याचबरोबर स्थलांतरही मोठ्या प्रमाणात झाल्याने मुलांची शाळा सुटली आहे. प्रवासासाठी पैसे नसल्याने (Financial crisis) काही विद्यार्थी शाळेत येत नाहीत. ही परिस्थिती केवळ ग्रामीण भागातीलच नाही, तर मुंबईसारख्या कुबेरनगरीचीही आहे. त्यामुळे देशातील सर्वात श्रीमंत शहर असणाऱ्या मुंबईत बालमजूर वाढण्याची (child workers possibility) भीती व्यक्त होत आहे.

हेही वाचा: मुंबई : 26 /11 च्या शहिदांना मुंबई पोलिसांनी वाहिली श्रद्धांजली

कोरोनाचा प्रादुर्भाव घटत असल्याने राज्य सरकारने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पालकांनी संमतीपत्र दिलेल्या ८ वी ते १० वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आता नियमित वर्ग सुरू झाले आहेत. महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये ७१ हजार ९२३ विद्यार्थी शिकत आहेत. मात्र, या शाळांतील २९ हजार ८१९ विद्यार्थी अद्याप शाळेत येत नसल्याचे कारण शोधण्यास शिक्षण विभागाने प्रयत्न केला. त्यात २४ हजार २८९ विद्यार्थ्यांना पालकांनी संमतीपत्र दिले नसल्याचे आढळले; तर तब्बल १४ हजार ६३५ विद्यार्थ्यांना पालकांनीच शाळेत जाण्यास मज्जाव केला.

मुलांना शाळेत पाठवण्यास नकार देणाऱ्या पालकांशी चर्चा केल्यावर कोविडबरोबर आलेल्या लॉकडाऊनचे गंभीर परिणाम अधोरेखित झाले आहेत. साधारण १४ हजार ६३५ विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुलांच्या आजाराचे कारण दिले, तर ३ हजारहून अधिक पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास इच्छुक नसून एक हजारच्या आसपास विद्यार्थ्यांचे स्थलांतर झाल्याची शक्यता आहे.
शाळेत न पाठविण्याच्या महत्त्वाच्या कारणांत शिकून साहेब होण्याची स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांना आता मिळेल तो रोजगार करावा लागत आहे. त्याचबरोबर घरापासून शाळेपर्यंत येण्यासाठी प्रवासाचे पैसे नसणे, हेही कारण पुढे आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे; अन्यथा त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसू शकतो.


"विद्यार्थी शाळेत येत नसल्याबद्दल सर्वेक्षण करण्यात आले. त्यात काही कारणे पुढे आली आहेत. हे विद्यार्थ्यी पुन्हा शाळेत यावेत, म्हणून प्रयत्न सुरू आहेत. यात पालक विद्यार्थ्यांचे समुपदेश करण्यात येत आहे. सेवाभावी संस्था आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घेऊन विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत."
- राजू तडवी, शिक्षणाधिकारी, मुंबई महानगरपालिका

loading image
go to top