esakal | आयआयटी आणि कस्तुरबा रुग्णालयाचे संशोधन; कोरोना आणि त्याची तीव्रता समजणार
sakal

बोलून बातमी शोधा

IIT Bombay

आयआयटी आणि कस्तुरबा रुग्णालयाचे संशोधन; कोरोना आणि त्याची तीव्रता समजणार

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : एखाद्या रुग्णाला कोरोना (corona patient) आणि त्याचा संसर्ग झाल्यानंतर त्याची नेमकी तीव्रता किती आहे, हे आता काही लवकरच समजणार आहे. यासाठी आयआयटी मुंबई (IIT Mumbai) आणि कस्तुरबा रुग्णालयातील (Kasturba hospital) संशोधकांनी याबाबत केलेला अभ्यास नुकताच आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'आयसायन्स' या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. या संशोधनासाठी कौन्सिल फॉर सायन्टिफिक अॅण्ड इंडस्ट्रीअल रिसर्च (CSIR) ने निधी उपलब्ध करून दिला होता.

हेही वाचा: कल्याण डोंबिवली पालिकेत काँग्रेसचा स्वबळाचा नारा

आयआयटी मुंबई आणि कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टरांनी एक अभ्यास केला असून त्यात त्यांनी रुग्णाच्या शरीरामध्ये विशिष्ठ प्रकारचे प्रोटीन किती प्रमाणात आढळते त्यावरुन आजाराची तीव्रता लक्षात येऊ शकते असा निष्कर्ष काढला आहे. त्याच आधारावर कोरोना आणि त्याची तीव्रता लक्षात घेता येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईच्या जैव विज्ञान आणि जैव इंजिनीअरिंग विभागाच्या प्रा. कृती सुवर्ण यांनी सांगितले की, कोणत्याही आजारावर सुरुवातीच्या काळात औषध निर्मिती करण्याची प्रक्रिया खूप अवघड आणि वेळखाऊ असते यामुळे यासाठी जास्तीत जास्त अभ्यास होणे आवश्यक आहे.

तर या संशोधन टीमचे प्रमुख डॉ. संजीव श्रीवास्तव यांनी उपचारादरम्यान रुग्णाच्या शरीरात वारंवार बदल होत असतात. त्यावर देखरेख ठेवता यावी या उद्देशाने या अभ्यासचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यामुळे उपचार करणेही अधिक सुलभ होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच यासाठी यासाठी संशोधकांनी ‘सिलेक्टेड रिअॅक्सन मॉनिटरिंग’ (एसआरएम) प्रणालीचा वापर केला असल्याचे त्यांनी सांगितले.

loading image
go to top