ठाणे जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी! कोरोनाची रुग्णसंख्या येतेय नियंत्रणात, आज दिवसभरात...

राहुल क्षीरसागर : सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 21 July 2020

ठाणे ग्रामीण भागात 177 रुग्णांची, तर 5 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 4 हजार 533, तर मृतांची संख्या 120 वर गेली आहे.

ठाणे : काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ चिंतेचा विषय होता. मात्र, तीन दिवसांपासून बाधितांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेही दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1 हजार 323 नवीन बाधित रुग्णांची भर पडली; तर 40 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 70 हजार 513; तर मृतांची संख्या 1 हजार 969 झाली आहे. 

मोठी बातमीपुणे, नाशिक, नागपूर नाही, मुंबईकरांना सर्वात आधी अनुभवायला मिळणार आपलं आयुष्य बदलून टाकणारं तंत्रज्ञान...

जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या 24 तासांत 268 रुग्णांसह 9 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 16 हजार 602 तर, मृतांची संख्या 264 इतकी झाली आहे. ठाणे महापालिका हद्दीत 187 बाधितांची, तर 2 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या 16 हजार 215, तर मृतांची संख्या 576 वर गेली आहे. 

Corona : हॉटेल्सकडून होणारी क्वारंटाईन रुग्णांची लुबाडणूक थांबणार; दर निश्चित करत 'या' पालिकेकडून कारवाईचा इशारा

नवी मुंबई महापालिकेत 254 रुग्णांची, तर 7 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 11 हजार 966, तर मृतांची संख्या 352 वर पोहोचला आहे. मिरा भाईंदरमध्ये 150 रुग्णांची, तर 7 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 6 हजार 834, तर मृतांची संख्या 233 झाली. भिवंडी महापालिका क्षेत्रात 90 बाधितांची, तर 3 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या 3 हजार 256, तर मृतांची संख्या 180 वर पोहोचली. उल्हासनगर 100 रुग्णांची, तर 4 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 5 हजार 866, तर मृतांची संख्या 92 झाली आहे. अंबरनाथमध्ये 39 रुग्णांची, तर 3 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 3 हजार 210, तर मृतांची संख्या 121 वर पोहचली आहे. बदलापूरमध्ये 58 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 2 हजार 31 झाली. ठाणे ग्रामीण भागात 177 रुग्णांची, तर 5 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 4 हजार 533, तर मृतांची संख्या 120 वर गेली आहे. 

नक्की वाचा : बापरे ! "...नाहीतर तब्बल '५० लाख' कर्मचारी होतील बेरोजगार", वाचा कुणी व्यक्त केलीये 'ही' भीती

महापालिका क्षेत्र   -   रुग्ण संख्या   -   मृत्यू 
ठाणे                   -       187         -     02 
कल्याण-डोंबिवली -       268         -     09 
नवी मुंबई            -       254         -     07 
मिरा भाईंदर         -       150         -     07 
भिवंडी                 -         90         -     03 
उल्हासनगर          -       100         -     04 
अंबरनाथ              -         39         -     03 
बदलापूर               -         60         -     00 
ठाणे ग्रामीण          -        177        -     05 

(संपादन : वैभव गाटे)

corona patients are under control in thane district read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patients are under control in thane district read full story