esakal | मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विळखा? रुग्णांमध्ये 20 टक्के वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Corona patients

मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विळखा? रुग्णांमध्ये 20 टक्के वाढ

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : गेल्या चार दिवसांपासून मुंबईत 400 पेक्षा जास्त रुग्णाची (corona patients) नोंद झाली आहे. 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान मुंबईत 2,279 प्रकरणे आणि 15 मृत्यूची (corona deaths) नोंद झाली, ज्यामुळे रुग्णांची संख्या 7, 43,154 वरून 745,433 आणि मृत्यूंचा आकडा 15,987 वर पोहोचला आहे. दरम्यान, राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून (health department report) असे दिसून आले आहे की मागील आठवड्याच्या तुलनेत गेल्या सात दिवसांत कोविड रुग्णांमध्ये तब्बल 20 टक्के वाढ झाली आहे. मुंबईतील ही रूग्ण वाढ तिसऱ्या लाटेची (corona third wave) सुरुवात आहे का अशी शंका उपस्थित केली जात आहे. मात्र, कोरोना राज्य कृती दल तज्ज्ञांनी ही शंका खोडून काढत वाढत्या रुग्णसंख्येचे लाटेत परिवर्तन होताना काही निकष टप्पे आहेत तसें यात दिसून येत नसल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा: गणेशोत्सवानिमित्त पश्चिम, कोकण रेल्वेवरून विशेष गाड्या; वाचा सविस्तर

दरम्यान, 21 ते 27 ऑगस्ट या आठवडाभरात मुंबईत एकूण  1,893 कोविड रुग्ण आढळले. तर, 22 जणांचे मृत्यू झाले आहेत. ज्यामुळे रुग्णसंख्या 7, 40,870 वरुन 7,42,763 पर्यंत वाढली आहे.  28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान, शहरात 2, 279 रुग्ण आढळले, त्यात 15 मृत्यूची नोंद झाली आहे. त्यानंतर, रुग्णसंख्या 743,154 वरून 745,433 वर गेली आहे.  

रुग्णसंख्येत भर पडत असली तरी शहरात मृतांची संख्या घटली आहे. दैनंदिन सक्रिय रुग्णांचा दर जो गेल्या काही आठवड्यांसाठी 1% च्या खाली होता तोही आता वाढला असला तरी ही तिसऱ्या लाटेची सुरुवात नसल्याचे तज्ञ सांगतात. चाचण्यांची संख्या वाढल्याने गेल्या सात दिवसांमध्ये रुग्ण वाढ झाली आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार, 21 ते 27 ऑगस्ट दरम्यान, शहरात 2, 10,140 चाचण्या घेण्यात आल्या, ज्यात 1,893 बाधित रुग्ण आढळले.

तर , 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान 2, 56,214 चाचण्या घेण्यात आल्या, त्यात 2,279 बाधित रुग्ण आढळले, म्हणजे पॉझिटिव्हीटी दर 0.88 टक्के होता. दरम्यान, 3 फेब्रुवारी 2020 ते 3 सप्टेंबर 2021 दरम्यान शहरात एकूण 9.3 दशलक्ष चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यात बाधित रुग्ण सापडण्याचा दर  7.94 टक्के आहे.

हेही वाचा: उत्तरप्रदेशातील भोलेनाथ गोस्वामीची वसईत हत्या; आरोपी अटकेत

राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की, " 15 ऑगस्टपासून रेल्वेसेवा सुरू झाली.  तसेच, काही नियम देखील शिथिल झाले. त्यामुळे, रुग्ण संख्येत वाढ अपेक्षित होती.  परंतु, अजूनही हा आकडा 400 च्या आसपास नियंत्रित करण्याची संधी आहे. जर कोविड नियमांचे पालन केले नाही तर रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, याला तिसऱ्या लाटेची सुरुवात म्हणता येणार नाही. मात्र, तिसरी लाट दारात उभी टाकली आहे त्यामुळे आपण सावध राहणे देखील गरजेचे आहे.

दरम्यान, रविवारी शहरात 496 रुग्ण आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला. त्यानुसार, मुंबईतील रुग्णांची संख्या 7,46,346 आणि मृत्यू 15,993 एवढे आहे.  तसेच आतापर्यंत 7, 24,077 कोविड आजारातून बरे झालेले रुग्ण आहेत. तर, मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के आहे.  सध्या शहरात 3,815 सक्रिय रुग्ण आहेत.

loading image
go to top