esakal | गणेशोत्सवानिमित्त पश्चिम, कोकण रेल्वेवरून विशेष गाड्या; वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Konkan railway

गणेशोत्सवानिमित्त पश्चिम, कोकण रेल्वेवरून विशेष गाड्या; वाचा सविस्तर

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त (Ganpati Festival) पश्चिम आणि कोकण रेल्वे (Konkan railway) मार्गावरून विशेष गाड्या (special train) चालविण्यात येणार आहेत. मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस ते मडगाव, सुरतकल आणि कुडाळ या दरम्यान विशेष गाड्या धावणार आहेत. प्रवाशांच्या गर्दीचे विभाजन (commuters crowd management) करण्यासाठी 5 गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने (Railway authorities) घेतला आहे.

हेही वाचा: 'मुंबई-अहमदाबाद' महामार्गावरील समस्या; उद्या रास्ता रोको आंदोलन

गाडी क्रमांक 09185/09186 मुंबई सेंट्रल-मडगाव-मुंबई सेंट्रल विशेष गाडी 10 आणि 17 सप्टेंबर यावेळी या गाडीला दोन अतिरिक्त स्लीपर क्लास डबे जोडण्यात येतील. ही गाडी 10 आणि 17 सप्टेंबर रोजी मुंबई सेंट्रल येथून रात्री 11.55 वाजता मडगावसाठी सुटेल. तर, ही गाडी मडगाव येथे दुपारी 3 वाजता पोहचेल.

गाडी क्रमांक 09187/09188 वांद्रे टर्मिनस- मडगाव-मडगाव एसी विशेष गाडी वांद्रे टर्मिनस येथून 12, 19 सप्टेंबर यावेळी या गाडीला एक अतिरिक्त तृतीय श्रेणी डबा आणि अतिरिक्त एसी चेअर कार डबा जोडण्यात येईल. ही गाडी वांद्रे टर्मिनस येथून रात्री 11.55 वाजता मडगावसाठी सुटेल. तर, ही गाडी मडगाव येथे दुपारी 3 वाजता पोहचेल.

हेही वाचा: 'KDMC' च्या पाठबळामुळे अनधीकृत बांधकामे वाढली; समाजसेवकांचा आरोप

गाडी क्रमांक 09193/09194 बांद्रा टर्मिनस-मडगाव एसी विशेष 7 सप्टेंबर रोजी या गाडीला एक अतिरिक्त तृतीय एसी डबा आणि एक अतिरिक्त एसी चेअर कार डबा जोडण्यात येणार आहे. ही गाडी वांद्रे येथून रात्री 11.55 वाजता मडगावसाठी सुटेल. तर, ही गाडी मडगाव येथे दुपारी 3 वाजता पोहचेल. गाडी क्रमांक 09183/09184 मुंबई सेंट्रल-सुरतकल विशेष गाडीला 8 आणि 15 सप्टेंबर रोजी दोन अतिरिक्त स्लीपर क्लास डबे जोडण्यात येईल. ही गाडी मुंबई सेंट्रल येथून रात्री 11.55 वाजता सुरतकल सुटेल.

तर, ही गाडी सुरतकल येथे रात्री 8 वाजता पोहचेल. गाडी क्रमांक 09195/09196 उधना- मडगाव सुपरफास्ट विशेष गाडी 9 सप्टेंबर रोजी एक अतिरिक्त तृतीय श्रेणी डबा, चार स्लीपर क्लास डबा आणि दोन सेकंड क्लास सीटिंग डबा सात अतिरिक्त डबे जोडण्यात येतील. ही गाडी उधना येथून दुपारी 3.25 वाजता सुटेल. तर, मडगाव येथे सकाळी 9.05 वाजता पोहचेल, अशी माहिती पश्चिम आणि कोकण रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

loading image
go to top