खुशखबर! ठाण्यात आजपर्यंत तब्बल `इतके` रुग्ण झाले बरे

corona
corona

ठाणे  ः ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढ असतानाच, यातून मुक्त होणाऱ्या रुग्णाची संख्याही वाढल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सहा हजार 690 पैकी तीन हजार 573 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत दोन हजार 914 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. 
ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या दोनशेच्या पार जात असल्याचे चित्र आहे. त्यात बुधवारी बाधितांची आकडेवारी चारशेच्या उंबरठ्यावर गेली. त्यामुळे जिल्ह्याती कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सहा हजार 690 इतका झाला आहे.

रुग्णांच्या वाढत्या संख्यमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, असे असले, तरी करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ होत असल्याने जिल्हावासींना काहीसा दिलासा मिळत आहे. जिल्ह्यात विविध शहरांमध्ये आत्तापर्यंत २ हजार 914 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मात्र, सरकारच्या नियमानूसार करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आणि मृत्यू झालेल्यांची संख्या एकूण करोनाबाधितांच्या संख्येतून वजा केली जात नसल्याने करोनाची लागण झालेल्यांची संख्या अधिक दिसते. त्यामुळे जिल्ह्याातील करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वजा केल्यास सध्याच्या घडीला तीन हजार 573 कोरोना रुग्णांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. एकुण ६ हजार 690 रुग्णांपैकी जिल्ह्याातील 201 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये ठाण्यातील 72, नवी मुंबईतील 59, कल्याण-डोंबिवलीतील 26, मीरा-भाईंदरमधील 19, उल्हासनगरमधील 9, भिवंडीतील 2, अंबरनाथमधील 2, बदलापूरमधील 7 आणि ठाणे ग्रामीणमधील 8 रुग्णांचा समावेश आहे.
महत्त्वाची बातमी ः  अरे वाह! कोरोनाकाळात 'या' आधुनिक पद्धतीनं मिळणार पोलिसांना दिलासा..समोरासमोर समस्या मांडता येणार  
 

शहर, एकुण रुग्णांची संख्या, करोनामुक्त रुग्ण, बाधित रुग्ण
ठाणे  2 हजार 450,1077,1 हजार 301
नवी मुंबई 1 हजार 853,840, 954
कल्याण-डोंबिवली 882,286, 570
मीरा-भाईंदर 577,354,203
भिवंडी 102,41,57 
उल्हासनगर 245,62,174
अंबरनाथ 85,27,57 
बदलापूर 192,73,112 
ठाणे ग्रामीण 304,154,142 
एकुण 6  हजार 690,2 हजार 914, 3 हजार 573


 

corona patients discharged thane

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com