esakal | ग्लोबल हॉस्पिटल प्रकरणी डॉ.केळकर यांना एक लाखांचा दंड
sakal

बोलून बातमी शोधा

doctor

ग्लोबल हॉस्पिटल प्रकरणी डॉ.केळकर यांना एक लाखांचा दंड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे महापालिकेने (thane municipal) कोरोनाबाधित रुग्णांच्या (corona patients) उपचारासाठी ग्लोबल हॉस्पिटलची (Global hospital) उभारणी केली आहे. या हॉस्पिटलमधील स्टाफ नर्सकडे उपायुक्त डॉ. विश्नवाथ केळकर (dr vishwanath kelkar) यांनी शरीर सुखाची मागणी केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. तसेच, या संदर्भात पोलीसांतही तक्रार (police complaint) दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाच्या चौकशीनंतर विशाखा समितीने डॉ. केळकर यांना एक लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

हेही वाचा: नवी मुंबई ते सातारा,जावळी प्रवासी भाडे ५०० ते ६०० रुपये; बसचालकांकडून लूट

मागील वर्षी मार्च २०२० मध्ये सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना खाटांच्या उपलब्धतेसाठी ठाणे पलिका प्रशासनाने साकेत येथे ग्लोबल हॉस्पिटल उभारले. या हॉस्पिटलचा कारभार उपायुक्त डॉ. विश्वनाथ केळकर यांच्या सोपविण्यात आला होता. याच दरम्यान, केळकर यांनी हॉस्पिटलमधीलच स्टाफ नर्ससोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. याची गांभीर्याने दाखल घेत भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी महापलिका आयुक्तांची भेट घेतली होती.

या हॉस्पिटलमध्ये पीडित स्टाफ नर्सची नियुक्ती जून २०२० मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर तिचे काम बघून तिला असिस्टंट मेट्रेन म्हणूनही बढती दिली होती; मात्र वर्षभरातच कागदपत्र योग्य नसल्याचे करण देत तिला कमी करण्यात आले. नर्सने उपायुक्तांच्या शरीर सुखाच्या मागणीस नकार दिल्यानेच तिला कामावरून कमी करण्यात आल्याचा आरोपदेखील वाघ यांनी केला होता. दरम्यान, डॉ. केळकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची गांभीर्याने दाखल घेत, विशाखा समितीमार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली होती.

तर संबंधीत पीडित नर्सने सुद्धा केळकर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दखल केली होती. त्यात विशाखा समितीने चौकशीचा अहवाल तयार करून पालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांना सादर केला आहे. तसेच या समितीने डॉ. केळकर यांना समितीने एक लाखांचा दंड केला असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. असे असले तरी दुसरीकडे मात्र, या अहवालात काय निष्कर्ष काढण्यात आले याबाबत प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.

loading image
go to top