esakal | नवी मुंबई ते सातारा,जावळी प्रवासी भाडे ५०० ते ६०० रुपये; बसचालकांकडून लूट
sakal

बोलून बातमी शोधा

private vehicles

नवी मुंबई ते सातारा,जावळी प्रवासी भाडे ५०० ते ६०० रुपये; बसचालकांकडून लूट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सानपाडा: गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर (Ganpati festival) खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी (Private travels) थेट दुप्पट तिकीट आकारणी केल्यामुळे प्रवासीवर्ग (commuters rent) नाराजी व्यक्त करत आहे. या ट्रॅव्हल्स चालक परिवहन विभागाच्या निर्देशाचा (RTO) जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. कोकणातील (konkan) चाकरमान्यांप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात देखील देशावरील लोक गौरी सणाला आपापल्या गावी जात असतात.

हेही वाचा: पालघर जिल्हा परिषदेच्या 15 जागांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान

सातारा, जावळी, मेढा या भागात जाण्यासाठी दरररोज अनेक खाजगी ट्रॅव्हल्सच्या लगझरी बसेस,टेम्पो ट्रॅव्हलर्स जीपगाड्या कोपरखैरणे भागातून सुटत असतात. इतरवेळी २५० ते ३०० रुपयांत थेट गावाला जाण्याची प्रवासी सेवा देणाऱ्या या खासगी ट्रॅव्हल्सचालकांनी गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर तिकिटांचे दर थेट ५०० ते ६०० असे दुप्पट करून प्रवाश्यांची लूट चालवली आहे.

प्रवाशीही त्याच भागातील आणि ट्रॅव्हल्स चालक देखील त्याच भागातील असतानाही इंधन दरवाढ झाल्याच्या नावाखाली हे ट्रॅव्हल्स चालक थेट दुप्पट तिकीट आकारणी करत असल्याने प्रवाश्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकाच भागातील असल्याने प्रवाशी या ट्रॅव्हल्स बसेसना प्रथम पसंती देत असतात,या ट्रॅव्हल्स चालकांनी सणांच्या पार्श्वभूमीवर ३० टक्केपर्यंत म्हणजे २५० ते ३०० ऐवजी ३५० ते ४०० दरवाढ करणे एकवेळ समजू शकतो पण दुप्पट दरवाढ योग्य नाही,यावर परिवहन विभागाने निर्बंध घालायला हवेत असे प्रवाश्यांचे म्हणणे आहे.

loading image
go to top