esakal | काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या प्रकृतीबद्दल चांगली अपडेट

बोलून बातमी शोधा

satav
काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या प्रकृतीबद्दल चांगली अपडेट
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: काँग्रेसचे तरुण तडफदार नेते राजीव सातव (rajiv satav) यांच्या प्रकृतीबद्दल एक चांगली माहिती आहे. राजीव सातव यांना कोरोना व्हायरसची (corona virus) बाधा झाली आहे. राजीव सातव उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांच्या प्रकृतीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली आहे. त्यांनी पेपरवर स्वत: लिहून एक प्रश्नदेखील विचारला. डॉक्टर आता राजीव सातव यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्याचा विचार करत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी टि्वट करुन ही माहिती दिली आहे. (corona positive Congress leader rajiv satav health is improving)

राजीव सातव हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. ते हिंगोलीचे माजी खासदार आहेत. २०१४ साली संपूर्ण देशात मोदी लाट असतानाही राजीव सावत हिंगोलीमधुन निवडून आले होते. राजीव सातव यांच्याकडे काँग्रेसने गुजरातच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे.

हेही वाचा: तिसऱ्या लाटेचा इशारा: अशी आहे मुंबईची तयारी

पुण्याच्या जहांगीर रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राजीव सातव यांची प्रकृती गंभीर होती. त्यावेळी त्यांना मुंबईत लिलावती रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्याचा विचार सुरु होता. काँग्रेसचे नेते आणि सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम हे राजीव सातव यांच्यासोबत आहेत. विश्वजीत कदम आणि जहांगीर रुग्णालयाचे डॉक्टर गील यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली होती.