esakal | तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मुंबईची अशी आहे तयारी

बोलून बातमी शोधा

covid hospital
तिसऱ्या लाटेचा इशारा: अशी आहे मुंबईची तयारी
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: जुलै-सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट (third wave)येण्याचा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ वर्तवत आहेत. या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेने (BMC) आतापासूनच तयारी सुरु केली आहे. महापालिकेने वैद्यकीय सुविधा (Medical facility) बळकट करण्यावर भर दिला आहे. दररोज कोरोनाच्या (corona patient) २,५०० गंभीर रुग्णांवर एकाचवेळी उपचार करता येतील, अशा पद्धतीने वैद्यकीय सुविधा उभारण्याची योजना आहे. त्याशिवाय लहान मुलांसाठी ४०० बेडचे स्वतंत्र कोविड सेंटर, अतिरिक्त ऑक्सिजन प्लान्ट नवीन जम्बो ऑक्सिजन सेंटर उभारण्याची योजना आहे. (How mumbai will tackle third wave)

सध्या ११,२०० ऑक्सिजन बेड्स आहेत. या बेड्सची संख्या आणखी ६००० ने वाढवण्यात येईल. सध्या २९०० आयसीयू बेड्स आहेत. त्यामध्ये आणखी १५०० बेड्सची भर घालण्यात येईल. तिसऱ्या लाटेत लहान मुलांच्या उपचारांवर विशेष लक्ष देण्यात येईल. गोरेगावच्या नेस्को जम्बो सेंटरमध्ये लहान मुलांसाठी ४०० बेड्सचे कोविड केंद्र उभारण्यात येईल. लहान मुलांसाठीचे हे सेंटर महिन्याभरात तयार होईल.

हेही वाचा: मुंबईच्या महापौरांनाच BMC कार्यक्रमाचं निमंत्रण नसतं का?

दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची निर्माण झालेली कमतरता लक्षात घेऊन महापालिका अतिरिक्त ऑक्सिजन प्लान्टस उभे करत आहेच. त्याशिवाय रेमडेसिव्हीर, टॉसिलझुम्बा इंजेक्शनचा अतिरिक्त साठा करुन ठेवला जाईल. "कोरोनाची लागण झाल्यानंतर दररोज रुग्णालयात दाखल करण्याची गरज असलेल्या २,५०० रुग्णांवर आम्हाला उपचार करता आले पाहिजेत, त्या दृष्टीने आम्ही स्वत:ला तयार करत आहोत" असे अतिरिक्त महापालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांनी सांगितले.

हेही वाचा: मग कदाचित सामना पेपर खोटं बोलत असावा - मनसे

"तिसरी लाट येईल किंवा नाही येणार, पण त्यासाठी आम्हाला तयार असले पाहिजे. व्हायरसमध्ये होणाऱ्या परिवर्तनावर सुद्धा लक्ष ठेवावे लागेल. पहिल्या लाटेच वृद्धांना सर्वात जास्त फटका बसला. दुसऱ्या लाटेत ३० वर्षावरील वयोगटातील नागरीक सर्वात जास्त बाधित झाले. तिसऱ्या लाटेत लहान मुले सर्वाधिक बाधित होऊ शकतात. त्या दृष्टीने आम्ही तयारी करत आहोत" असे टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले.