पनवेलमध्ये कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू, 27 नव्या रुग्णांची भर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

सद्यस्थितीत पालिका हद्दीत कोरोनाचे 351 रुग्ण असून, ग्रामीणमधील रुग्णांचा आकडा 142 इतका झाला आहे.

पनवेल : पनवेल पालिका हद्दीत नव्याने 19 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, ग्रामीण भागात 8 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यात शनिवारी (ता.23) 27 रुग्णांची नोंद झाली.

महत्वाची बातमी कोरोना झाल्यास पोलिसांवर तातडीने उपचार होणार, महाराष्ट्र कुटूंब आरोग्य योजनेत कोव्हिडचा समावेश

सद्यस्थितीत पालिका हद्दीत कोरोनाचे 351 रुग्ण असून, ग्रामीणमधील रुग्णांचा आकडा 142 इतका झाला आहे. पालिका हद्दीत शनिवारी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने पालिका हद्दीतील मृतांचा आकडा 16 वर जाऊन पोहोचला आहे. तर ग्रामीण भागात आतापर्यंत 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महत्वाची बातमी : विद्यार्थ्यांनो...! परिक्षेबाबत मुंबई विद्यापीठाने घेतला महत्वपूर्ण निर्णय, वाचा

पालिका हद्दीत आतापर्यंत सापडलेल्या 352 रुग्णांपैकी 196 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागात आढळून आलेल्या 141 रुग्णांपैकी 74 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Corona positive disease death in Panvel, 27 new corona patients 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona positive disease death in Panvel, 27 new corona patients