कोरोनाची 'ती' अफवा पसरली अन् अख्खी सोसायटी हदरली, मग काय 'सत्य' तर भलतच निघालं

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

याबाबत प्रभाग क्र 43 चे नगरसेवक विनोद मिश्रा यांच्या वतीने पालिकेच्या 15 डॉक्टरांच्या टीमने संपूर्ण सोसायटीच्या राहिवाशांची तपासणी केली.

मालाड : मालाड (पु) येथील ओंकार अल्टामाउंटन सोसायटीत 168 कोरोना संक्रमित रुग्ण असल्याची अफवा पसरविण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण सोसायटीत भीतीचे वातावरण पसरले होते.

महत्वाची बातमी : वेब सीरिज बघताय जरा सावध व्हा, नाहीतर तर होऊ शकतं हे...

याबाबत प्रभाग क्र 43 चे नगरसेवक विनोद मिश्रा यांच्या वतीने पालिकेच्या 15 डॉक्टरांच्या टीमने संपूर्ण सोसायटीच्या राहिवाशांची तपासणी केली. त्यानंतर ही अफवा असल्याचे समोर आले. या सोसायटीत एकूण 10 रुग्ण कोरोना संक्रमित होते त्यापैकी सहा रुग्ण बरे झाले, तर चार रुग्ण अद्याप उपचार घेत आहेत. त्यामुळे चुकीची माहिती प्रसारित झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा : वीजबिल जास्त येण्यामागची 'ही' आहेत कारणं, 'म्हणून' बसलाय तुम्हाला वीजबिलाचा शॉक

प्रभाग क्रमांक 43 च्या ओंकार अल्टामाऊंटन मधील कोरोना रुग्णांबाबत खोटी अफवा पसरवली आहे. जनतेने अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नये. मात्र सर्वांनी स्वत: सुरक्षित राहावे असे आवाहन नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केले आहे.

Corona rumors spread and the whole society was shock


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona rumors spread and the whole society was shock

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: