वीजबिल जास्त येण्यामागची 'ही' आहेत कारणं, 'म्हणून' बसलाय तुम्हाला वीजबिलाचा शॉक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

प्रत्येक स्लॅब नुसार प्रति युनिट वीजदर बदलत असतात. या वेगवेगळ्या टॅरिफ स्लॅबमुळे देखील ग्राहकांना विजेच्या बिलांचा शॉक बसलाय.  

मुंबई - कोरोना, कोरोनामुळे आलेला लॉकडाऊन आणि त्यामुळे ठप्प झालेलं कामकाज. अशात एकीकडे नोकरी धंदा नसताना वीज वितरण कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना सरासरी वीजबिलाच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा वीज बिलं पाठवून मोठा शॉक दिलाय. कोरोनामुळे सर्व काही बंद आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वीज कंपन्यांकडून मीटर रिडींग न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये तीन महिन्यांच्या वीजबिलाची सरासरी काढून वीज कंपन्यांनी ग्राहकांना वीजबिल पाठवली. मात्र  अनेकांना काही हजारांच्या घरात विजेची बिलं आलेली आहेत. यामधून सेलिब्रिटीज देखील सुटलेले नाहीत. 

Breaking : मुंबईच्या ताज हॉटेलला दहशतवादी हल्ल्याचा धमकीचा फोन... यंत्रणा अलर्ट

काय आहेत जास्त वीजबिल येण्यामागची कारणे.. 

  • कोरोनामुळे फेब्रुवारीच्या शेवटी लॉकडाऊनचे वारे वाहत होते. मार्च महिन्यापासून केंद्राकडूनही लॉकडाऊन जाहीर झाला. यामुळे प्रत्यक्ष सोसायट्यांमध्ये जाऊन मीटर रीडिंग घेणं बंद झालं. 
  • एप्रिल आणि मे महिन्यात आलेलं वीजबिल हे  त्यामागील तीन महिने म्हणजे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांच्या सरासरीवर आधारित होतं.
  • जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये सर्व सुरु होतं, हिवाळा होता, सर्वजण घाबाहेर पडत होते म्हणून वीजबिल कमी होतं. मात्र त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात महिन्यात उकाडा वाढला, सर्वजण घरात होते. त्यामुळे घरातील विजेचा वापर वाढला.

कसं होणार MissionBeginAgain? निम्म्यांहून जास्त मुंबई कंटेन्मेंट झोनमध्ये 

  • आता जूनमध्ये वीज कंपन्यांनी घरोघरी, सोसायट्यांमध्ये जाऊन मीटर रीडिंग घेणं बऱ्यापैकी सुरु केलंय.
  • आता जून महिन्यातील वीजबिल हे एप्रिल आणि मे महिन्यातील वीजबिलाच्या प्रत्यक्ष वापरावर आधारित होतं. 
  • म्हणजे या आधी वीज कंपन्यांनी सरासरीप्रमाणे ज्यांना १०० युनिट्सचं बिल पाठवलं, मात्र त्यांचा वापर १२० युनिट्स होता अशा ग्राहकांना एप्रिल आणि मे महिन्यातील अतिरिक्त २०-२० युनिट म्हणजे ४० अतिरिक्त युनिटचे वीजबिल जून महिन्यात ऍड करून पाठवलं.   

यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे वीजबिलाचे स्लॅब्स. प्रत्येक स्लॅब नुसार प्रति युनिट वीजदर बदलत असतात. या वेगवेगळ्या टॅरिफ स्लॅबमुळे देखील ग्राहकांना विजेच्या बिलांचा शॉक बसलाय.  

why consumers got huge electricity bills read full news and math behind this
      


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: why consumers got huge electricity bills read full news and math behind this