कोरोनाची गंभीर लक्षणे ओळखण्यासाठी इन्फ्रारेड तंत्रज्ञानाचा; 'IIT' चे संशोधन

IIT Bombay
IIT Bombay sakal mumbai
Updated on

मुंबई : गंभीर कोरोना लक्षणे (corona symptoms) ओळखण्यासाठी आयआयटी मुंबईच्या (IIT Mumbai) प्राध्यापकांच्या नेतृत्वाखालील (professor) संशोधकांच्या टीमने इन्फ्रारेड तंत्रज्ञानाचा (infrared technology) वापर करण्याची एक नवीन पद्धत विकसित केली आहे. यामुळे गंभीर लक्षणे ओळखून रुग्णावर वेळेत उपचार करण्यासाठी (patient treatment) मोठी मदत होणार असल्याचे आयआयटी मुंबईतील संशोधक प्राध्यापकांकडून सांगण्यात आले.

आयआयटी मुंबईतील या नव्या संशोधनामुळे एखाद्या रुग्णाची कोरोणामुळे गंभीर स्थिती लक्षात येणार आहे, यासाठी इन्फ्रारेड स्पेक्टरोस्कोपी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. हे तंत्रज्ञान आयआयटी मुंबईच्या जैवविज्ञान आणि जैव इंजिनीअरिंग विभागाने विकसित केले आहे. कस्तुरबा येथील 160 कोविड रुग्णांच्या गटात गंभीर प्रकरणांचे वर्गीकरण करण्यासाठी संशोधकांनी फूरियर-ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड (एफटी-आयआर) स्पेक्ट्रोस्कोपीचा रक्त चाचणी म्हणून वापर केला. तसेच आयआयटी मुंबई, कस्तुरबा हॉस्पिटल, क्यूआयएमआर बर्गोफर मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, ऑस्ट्रेलिया यांच्या एकत्रित सहयोगाने हे तंत्रज्ञान विकसीत झाले आहे.

IIT Bombay
मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास वादात छोटा शकीलच्या भावाची उडी ; गुन्हा दाखल

सर्वसामान्यांना परवडणारी चाचणी

इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी सामान्यतः कोणत्याही रक्ताच्या नमुन्यातील विविध रासायनिक गटांची पातळी मोजण्यासाठी वापरली जाते. कोविड रूग्णांच्या अभ्यासात 85 टक्के अचूकतेसह केलेली चाचणी ही उपचारादरम्यान उपयुक्त ठरू शकते. या चाचणीनंतर रूग्णांचे प्राथमिक मूल्यांकन, सामान्यतः कोरोना रुग्णाची काळजी घेण्याची निकड ठरवण्यासाठी जिथे कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. त्या भागात या चाचणीचा वापर केला जाऊ शकतो. शिवाय या चाचणीचा निकालही अवघ्या काही तासात मिळणार असून सर्व सामान्यांना परवडेल इतक्या खर्चात ही चाचणी करता येणार असल्याचे सांगण्यात आले.

वर्गीकरण करण्यास होणार मदत

यातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या प्लाझ्मामधून केमिकल तपासणी करून कोरोना रुग्णाचे जास्त प्रादुर्भाव झालेले आणि कमी प्रादुर्भाव झालेले रुग्ण असे वर्गीकरण करणे आधीच शक्य होणार आहे. ज्यामुळे जास्त धोका असलेल्या रुग्णांसाठी विशेष काळजी घेता येणार आहे. डॉक्टरांना कोरोनाचा मोठ्या प्रादुर्भाव असलेल्या प्रदेशांमध्ये किंवा कोविड रुग्णांचे प्रमाण जास्त असलेल्या रुग्णालयांमध्ये गंभीर रुग्णांना प्राधान्य देण्यास हे तंत्रज्ञान मदत करू शकते, असे आयआयटीचे प्राध्यापक संजीव श्रीवास्तव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com