मुंबईत कोरोनाचं वाढतं टेन्शन ! गेल्या चार दिवसांत रुग्णांमध्ये दररोज 10 टक्क्यांची वाढ

मुंबईत कोरोनाचं वाढतं टेन्शन ! गेल्या चार दिवसांत रुग्णांमध्ये दररोज 10 टक्क्यांची वाढ
Updated on

मुंबई, 12 : मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिकेच्या चिंतेत भर पडत आहे. पालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसांत मुंबईतील रुग्णसंख्येत दरदिवशी 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, राज्य टास्कफोर्स समितीच्या माहितीनुसार जानेवारी आणि फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत रुग्णसंख्या 6 पटीने वाढली आहे. त्यामुळे नक्कीच यापुढे कडक उपाययोजना केल्या पाहिजेत असे तज्ज्ञांचे मत आहे. तर, आज मुंबईत 1646 नवीन रुग्ण सापडले आहेत. दरम्यान,  ही संख्या पुढचे काही दिवस अशीच वाढू शकते असे चिंता राज्य टास्क फोर्स सदस्य डाॅ. अविनाश सूपे यांनी व्यक्त केली आहे. 

मुंबईत बुधवारी कोरोनाचे गेल्या 12 दिवसांतील सर्वाधिक रुग्ण आढळले असून 1539 नव्या रुग्णांची भर पडली होती.  त्यानंतर, गुरुवारी पुन्हा एकदा 1508 रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, 3 मार्चपासून मुंबईत हजाराच्या संख्येने रुग्ण आढळले आहेत, जी मार्च 1 आणि 2 तारखेला 800 च्या घरात होती. त्यामुळे, मुंबईतील रुग्णसंख्येचा आलेख हा चढता पाहायला मिळत आहे. 

मुंबईतील वाढलेल्या रुग्णसंख्येवर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, गेल्या चार दिवसांत दरदिवशी 10 टक्क्यांनी रुग्णसंख्या वाढली आहे. आजही 1600 पर्यंत रुग्ण सापडले आहेत. तर, फेब्रुवारीपासून आतापर्यंतचा जर आलेख पाहिला तर किमान 5 टक्क्यांनी रुग्णवाढ झालेली आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी टेस्टिंग, ट्रीटिंग आणि ट्रॅकिंग या तिन्ही गोष्टी वाढवण्याच्या सुचना दिल्या गेल्या आहेत. शिवाय, जे मास्कचा वापर करत नाहीत, नियम पाळत नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. 

लाॅकडाउन नाही पण कडक अंमलबजावणी -  

मुंबई सध्यातरी लाॅकडाउनच्या दिशेने नाही पण, नक्कीच नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. 90 टक्के रुग्ण हे इमारतींमधील आहेत. त्यामुळे, पूर्णपणे लाॅकडाउनचा कितपत फायदा होईल याचा अंदाज नाही. त्यामुळे, लोकांनी ही जबाबदारीने वागत मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टस्टिंग या त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक आहे असेही काकाणी यांनी स्पष्ट केले आहे. 

गेल्या 12 दिवसांचा आलेख - 

1 मार्च 855, 2 मार्च 849, 3 मार्च 1121, 4 मार्च 1103, 5 मार्च 1173, 6 मार्च 1188, 7 मार्च 1360, 8 मार्च 1008, 9 मार्च 1012, 10 मार्च 1539, 11 मार्च 1508, 12 मार्च 1646 एवढे रुग्ण सापडले आहेत.   

मुंबईत सर्वाधिक 1646 नवे रुग्ण - 

दरम्यान, मुंबईत नवीन रुग्ण वाढले असून आज 1,646 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 3,40,277 झाली आहे. तर 1122 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 3,15,359 रूग्ण बरे होऊन घरी गेले.  

मुंबईत आज 4 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. एकूण मृतांचा आकडा 11,519 इतका झाला आहे.रुग्ण बरे होण्याचा दर हा 93 टक्के इतका झाला आहे. तर रुग्णदुपटीचा दर खाली घसरला असून 196 दिवसांवर आला आहे. तर कोविड रुग्णवाढीचा दर वाढून 0.35 इतका झाला आहे. आतापर्यंत एकूण 35,16,816 कोविड चाचण्या करण्यात आल्या. 

मुंबईत आज मृत झालेल्या रुग्णांपैकी 4 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 3 पुरुष तर 1 महिला रुग्णाचा समावेश होता. मृतांपैकी दोघांचे वय 40 आणि दोघांचे वय 60 वर्षा वर होते. 

मुंबईत 30 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 214 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 10,691 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 493 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

corona tension increasing in mumbai since last 4 days patients increasing with 10 percent rate

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com