उल्हासनगरमध्ये विनामास्क दिसल्यास थेट होणार कोविड चाचणी

corona virus test
corona virus testsakal media

उल्हासनगर : कोरोनाची दुसरी लाट (Corona Second wave) अंशत: ओसरण्याचे संकेत आहेत. मात्र, डेल्टाप्लस ( Delta Plus Virus) या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे संभाव्य तिसऱ्या लाटेचा (Corona Third Wave) धोका निर्माण झाला आहे. कोरोना संक्रमण वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर (Mask less People) उल्हासनगर महापालिका (Ulhasnagar Municipal Corporation) कठोर कारवाई करणार आहे. सर्रासपणे विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची कोविड आरटीपीसीआर चाचणी (RTPCR Test) महापालिकेकडून केली जाणार आहे. कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर महापालिका प्रशासन कायदेशीर कारवाईचा बडगा उगारणार आहे. ( Corona Test on the Spot For Mask less people drive by Ulhasnagar Municipal Corporation)

corona virus test
खळबळजनक! मन्सुखच्या हत्येसाठी ४५ लाख रुपये दिले, NIA चा मोठा दावा

महापालिकेच्या अधिकारी विनामास्क फिरणारे नागरिक जिथे सापडतील तिथेच त्यांची कोविड आरटीपीसीआर चाचणी करत आहेत. उल्हासनगर महापालिकेने कोविडचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी 1 जुलैपासून विनामास्क फिरणाऱ्यांवर ही कारवाई सुरु केली आहे.

"उल्हासनगर शहरात आम्ही कोविडचे संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केल्यानंतर त्यांची कोविडची आरटीपीसीआर चाचणी सुद्धा केली जात आहे. महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या कोविड नियमांचे जे नागरिक उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल." अशी माहिती उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाने यांनी दिली आहे.

corona virus test
अधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादामुळे बारावीचे निकाल लांबणीवर

विनामास्क फिरणाऱ्या आणि कोविडचे नियम पायदळी तुडवणाऱ्या नागरिकांवर पोलिसांचीही करडी नजर आहे. यासाठी अनेक ठिकाणी पोलिसांना तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान उल्हासनगर महापालिका क्षेत्र राज्याच्या निर्बंध शिथिल करण्याच्या वर्गवारीनुसार तिसऱ्या टप्प्यात आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने सायंकाळी 4 वाजता बंद होतात.

रेस्टॅारंट्स आणि इतर खानावळ नागरीकांच्या 50 टक्के उपस्थित सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु असतात. त्यानंतर फूड डिल्हीवरी पार्सलच्या माध्यमातून देण्याची मुभा आहे. बुधवारी उल्हासनगरमध्ये कोविडच्या नविन 10 रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 20784 वर पोहोचली आहे. 20194 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत तर 506 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत कोरोनाचे 84 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com