...जेव्हा पोलिस अधिकाऱ्यालाच होते कोरोनाची लागण!

सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 6 एप्रिल 2020

कुरारमधील पोलिस अधिकाऱ्याला कोरोना 
निवासी इमारत सील; संपर्कातील तिघांची चाचणी 

मुंबई : कुरार पोलिस ठाण्यातील 39 वर्षीय उपनिरीक्षकाला कोरोना झाल्याचा अहवाल रविवारी मिळाला. त्याच्या संपर्कात आलेल्या तीन अधिकाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली नसली, तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांची चाचणी करण्यात येणार आहे. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 

कुरार पोलिस ठाण्यातील या उपनिरीक्षकाला मागील आठवड्यात ताप व खोकल्याचा त्रास सुरू झाला. त्यानंतर खासगी प्रयोगशाळेत त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे या पोलिस अधिकाऱ्याला भाभा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. बोरिवलीतील योगी नगर येथे राहणाऱ्या या अधिकाऱ्याने मागील आठवड्यातच पत्नी व मुलाला गावी पाठवले होते. सध्या तो घरात एकटाच राहत होता. 

अधिक बातम्यांसाठी "ईपेपर" वाचा।
 

महापालिका अधिकाऱ्यांनी सोमवारी त्याचे वास्तव्य असलेली इमारत सील करून परिसरात जंतुनाशक फवारणी केली. इमारतीमधील इतर रहिवाशांमध्ये कोरोनासदृश लक्षणे आहेत का, याची पाहणी करण्यात आली. त्याला कोरोनाची लागण कशामुळे झाली याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. कुरार परिसरातील पठाणवाडी व मालाडमधील जैन मंदिर येथे दोन "कंटेन्मेंट झोन' आहेत. तेथे त्याला पाठवण्यात आले होते का, याबाबत माहिती घेतली जात आहे. 

कुरार पोलिस ठाण्यातही जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे. या अधिकाऱ्याच्या संपर्कात असलेल्या तीन पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona TEST POSSITIVE OF police officer in the KURAR