ख्रिसमस, नवीन वर्षाच्या तोंडावर कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना | Corona test update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Virus Test

ख्रिसमस, नवीन वर्षाच्या तोंडावर कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना

मुंबई : परदेशातून येणाऱ्या प्रवाशांनी सोबत येताना कोविड (corona) आणू नये म्हणून पालिकेने (bmc) ख्रिसमसच्या (Christmas festival) तोंडावर चाचण्या (corona test) वाढवण्याच्या सुचना केल्या आहेत. आगामी महिन्यात वर्षाअखेरची धम्माल पार्टी आणि ख्रिसमसचा आठवडा साधून परदेशातून भारतात येणारे बहुतांश प्रवासी (international commuters) असतात. त्यामुळे मुंबई शहरात नवीन कोविड स्ट्रेन (new corona strain) दाखल होण्याआधी पालिकेकडून वॉर्डच्या आरोग्य विभागात चाचण्या वाढवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: मुंबई : टाटा रुग्णालयाला घरे मिळण्याचा मार्ग मोकळा

मुंबई महानगरपालिकेत 24 वॉर्ड आहेत. या वॉर्डमधून कोविड चाचण्या वाढवण्याच्या सुचना करत असताना कोरोना प्रतिबंधित अशा हालचाली सुरु केल्या आहेत. हजारो मुंबईकर शिक्षणा निमित्त, नोकरीच्या कामाने परदेशात गेले आहेत. हे परदेशी भारतीय आगामी येणाऱ्या ख्रिसमस आणि वर्षाअखेरच्या आठवड्यात सुटीच्या निमित्ताने भारतात परतण्याची शक्यता आहे. शिवाय परदेशातील काही देशांमध्ये कोविडच्या नव्या स्ट्रेनची लाट पसरली आहे.

त्या तुलनेत भारतात अद्याप तिसऱ्या लाटेचा फक्त अंदाजच केला जात आहे. त्यामुळे नव्या स्ट्रेनसोबत तिसऱ्या लाटेचा संसर्ग नको असल्याने पालिका सज्ज झाली आहे. त्यामुळे परदेशातून मुंबईत येणाऱ्या भारतीयांची स्क्रिनिंग आणि टेस्टिंग सुरु करण्यात आली आहे. ही तपासणी पुढील महिन्या पर्यंत सुरु राहणार असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. यावर बोलताना मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मुंबईत कोरोनाचे रुग्ण घटत असताना पालिका कोविडची कसून परिक्षण करत आहे.

दररोज कोविड रुग्ण नोंदवण्यात येत आहेत. दिवाळीच्या पंधरा दिवसानंतर कठीण काळ गेला. आता यापुढे 31 डिसेंबर पर्यंत पुन्हा एकदा परिक्षा सुरु होणार आहे. सध्या देण्यात आलेल्या सवलती आणि सुरु असणाऱ्या उत्सवांच्या गर्दीने कठीण काळ सुरु आहे. कठीण काळाचा हा टप्पा 20 नोव्हेंबर पर्यंत राहिल. मात्र त्यानंतर नव्या वर्षाच्या पार्ट्यां आणि ख्रिसमस याच्या पार्श्वभुमीवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवावे लागणार आहे. कारण हे सर्व परदेशी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे असल्याने ही काळजी घेण्यात येत आहे.

loading image
go to top