esakal | मुंबईत सलून, फूड डिलीव्हरी बॉय, सुरक्षा रक्षकांचीही कोरोना चाचण्या होणार
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत सलून, फूड डिलीव्हरी बॉय, सुरक्षा रक्षकांचीही कोरोना चाचण्या होणार

मुंबईत कोविड चाचणी मोहिमेची व्याप्ती वाढवली जाणार आहे. सलून, फूड डिलीव्हरी बॉय, सुरक्षा रक्षकांचीही कोरोना चाचण्या करण्याचा पालिकेचा निर्णय आहे. जलदगतीने संपर्क ट्रेसिंगच्या प्रयत्नामुळे मुंबई महानगरपालिका मुंबईत फुड डिलीव्हरी करणाऱ्या आणि किरकोळ वितरण अधिकाऱ्यांची चाचणी घेणारेय.

मुंबईत सलून, फूड डिलीव्हरी बॉय, सुरक्षा रक्षकांचीही कोरोना चाचण्या होणार

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई:  मुंबईत कोविड चाचणी मोहिमेची व्याप्ती वाढवली जाणार आहे. सलून, फूड डिलीव्हरी बॉय, सुरक्षा रक्षकांचीही कोरोना चाचण्या करण्याचा पालिकेचा निर्णय आहे. जलदगतीने संपर्क ट्रेसिंगच्या प्रयत्नामुळे मुंबई महानगरपालिका मुंबईत फुड डिलीव्हरी करणाऱ्या आणि किरकोळ वितरण अधिकाऱ्यांची चाचणी घेणार आहे. दिवाळी दरम्यान, विक्री करणारे आणि शॉप किपर्स यांची चाचणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. आता या मोहिमेची व्याप्ती वाढली असून फुड डिलीव्हरी करणारे सलून आणि सुरक्षा रक्षक यांचीही चाचणी घेतली जाणार आहे.

सहाय्यक आयुक्त (जी उत्तर) किरण दिघावकर यांनी सांगितले की, “आम्ही स्विगी, झोमाटो आणि तत्सम अन्न आणि किरकोळ समुदायाच्या काही वितरण अधिकाऱ्यांची चाचणी केली आहे. शिवाय त्यांच्या मुख्य संस्थांशी चर्चा करत आहोत. जेणेकरुन मोठ्या संख्येने चाचण्या केल्या जातील आणि संसर्ग पसरण्यापासून रोखता येईल. मंगळवारी जी उत्तर वॉर्डमधील दादर आणि माहिम परिसरात फूड डिलीव्हरी करणाऱ्यांची चाचणी घेतली गेली.

आता सर्वच सुविधा पुरवणारे लोक काम करत आहेत. या चाचण्यांमधून फक्त मुंबईकरांना सुरक्षित वाटावे हाच एक उद्देश आहे जेव्हा ते डिलीव्हरी बॉय कडून फूड किंवा सलूनमध्ये केस कापायला जातील. नोव्हेंबर महिन्यात जी नॉर्थ वॉर्डमधील 4 हजार 86 फेरीवाले, दुकानदारांची चाचणी घेतली गेली. त्यापैकी 51 जण कोविड 19 पॉझिटिव्ह आले.

अधिक वाचा-  धारावी पुर्नविकास प्रकल्पाचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात

आर उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी सांगितले की, बाजार परिसर किंवा जिथे शॉपिंग सेंटर्स आहेत. जिथे जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी आम्ही विशेष शिबिरे भरवली आहेत. 18 नोव्हेंबर या दिवशी 645 जणांची चाचणी केली गेली होती. त्यात एक ही व्यक्ती पॉझिटिव्ह आलेली नाही.

दरम्यान, सी वॉर्डमध्ये दैनंदिन चाचण्या घेतल्या जात आहेत. अँटिजेन रॅपिड चाचणी घेतली जात असून याचा उपयोग बाजार, कार्यालये आणि हॉटेल रेस्टॉरंट्समध्ये होत आहे. जास्तीत जास्त चाचण्या होणे हाच यामागचा हेतू आहे असे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अॅले यांनी सांगितलं आहे.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

फेरीवाल्यांच्या आजूबाजूला जे कोणी असतील त्या सर्वांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. सलूनवाल्यांची वेगळी चाचणी केली जात नाही. संसर्ग पसरु नये यासाठी घेतलेली ही खबरदारी आहे.
सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त (आरोग्य) 

------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

corona tests saloons food delivery boys and security guards bmc decided