esakal | चाचण्यांवर भर; पालिका आणि नगरसेवक नागरिकांना करणार जागरूक
sakal

बोलून बातमी शोधा

Corona test

चाचण्यांवर भर; पालिका आणि नगरसेवक नागरिकांना करणार जागरूक

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : कोरोनाची तिसरी लाट (corona third wave) गणेशोत्सवानंतर (Ganpati Festival) वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत नगरसेवकांसह महानगरपालिका (BMC) आता मुंबईकरांना जागरूक करण्याचा विचार करत आहे. पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, लवकरच आम्ही नगरसेवकांसोबत (corporators meeting) बैठक घेऊ. आम्ही नगरसेवकांना त्यांच्या भागातील नागरिकांना कोविड चाचणीसाठी (corona test) प्रेरित करण्यास सांगू. विशेषतः ते लोक जे इतर जिल्हा किंवा राज्यातून येत आहेत. 21 सप्टेंबरपासून आम्ही आणखी लक्ष केंद्रीत करणार आहोत.

हेही वाचा: अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या आरोपीला अटक

बसस्थानक, रेल्वे स्टेशन आणि इतर सार्वजनिक ठिकाणी स्क्रीनिंग आणि चाचणीचे कामही सुरू आहे. महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2022 पर्यंत असू शकते. अशा स्थितीत नगरसेवक आतापासून सक्रिय झाले आहेत. ते लोकांपर्यंत पोहोचत आहेत, अशा परिस्थितीत जर त्यांनी लोकांना चाचणीसाठी प्रेरित केले तर ते चांगले होईल.

राज्यात फक्त 27 मृत्यू

सोमवारी राज्यात कोरोनामुळे फक्त 27 लोकांचा मृत्यू झाला. गेल्या 6 महिन्यांत, कोविडमुळे आतापर्यंत सर्वात कमी मृत्यूची नोंद झाली आहे. तर, मुंबईत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोविडचे 2, 740 नवीन रुग्ण राज्यात सापडले. त्याचबरोबर मुंबईत 25,581 चाचण्यांनंतर 347 लोक कोरोना बाधित आढळले आहेत. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 49, 880 आहे, त्यापैकी 4, 744 सक्रिय रुग्ण मुंबईत आहेत.

मुंबईची आकडेवारी

एकूण चाचण्या - 9,74,1,455

एकूण सकारात्मक प्रकरणे- 7, 35, 403

एकूण मृत्यू- 16, 028

पूर्णपणे बरे - 7,12,162

दुप्पटीचा दर - 127 दिवस

चाळ/झोपडपट्टी सील- 0

सील इमारती - 38

राज्याची आकडेवारी

एकूण चाचण्या- 5,60,88,114

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- 65,00,617

एकूण मृत्यू- 1,38,169

एकूण बरे - 63,09,021

loading image
go to top