esakal | बोरिवली : अल्पवयीन मुलींना ढकलले वेश्या व्यवसायात; आरोपी अटकेत
sakal

बोलून बातमी शोधा

minor girl

अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या आरोपीला अटक

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : साकीनाका (sakinaka rape case) येथे महिलेवर झालेल्या बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच राज्यात आता महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बोरिवलीच्या एमजी रोड परिसरातील एका हाँटेलमध्ये अल्पवयीन मुलीना वेश्या व्यवसायास भाग पाडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी संबंधित आरोपीच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

दोन मुलींची सुटका; आरोपी अटकेत

अल्पपवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा १२ च्या पोलिसांनी अटक केली आहे. बोरिवलीच्या एमजी रोड परिसरातील एका हाँटेलमध्ये हे आरोपी वेश्या व्यवसायास मुलीना भाग पाडत होते. नितीन सिंह २८ असे या आरोपीचे नाव आहे. अन्य एक आरोपी अनिल सिंह हा फरार आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात दोन मुलींची सुटका केली असून या प्रकरणी अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलिस करत आहेत

हेही वाचा: मुंबईत पुन्हा अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, ५१ वर्षीय व्यक्तीला अटक

साकीनाका बलात्कार प्रकरण : महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरला

पुणे आणि मुंबईत झालेल्या बलात्काराच्या घटनांमुळे महाराष्ट्र सरकारवर सध्या टीका सुरु आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. दुसऱ्या राज्यातून येणाऱ्या लोकांचा रेकॉर्ड ठेवला जाईल असे त्यांनी सांगितले. साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. या प्रकरणामुळं केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरुन गेला आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणाशी या प्रकरणाची तुलना केली जात असून अमानुषपणे पीडित महिलेवर अत्याचार झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या भीषण बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडित महिला ही अनुसुचित जातीची असल्यानं मुंबई पोलिसांनी आरोपीवर अॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल केला आहे.

हेही वाचा: बोईसरमध्ये अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर केला अतिप्रसंग

loading image
go to top