खाकी वर्दीवर कोरोनाचा घाला! 24 तासांत राज्यात 'इतक्या' पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू

अनिश पाटील
Tuesday, 4 August 2020

 गेल्या 24 तासांत राज्यात 3 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्य पोलिस दलातील मृतांचा आकडा 107 वर पोहोचला आहे.  गंभीर बाब म्हणजे मृतांमध्ये एक 32 वर्षीय पोलिसाचा सहभाग आहे. या व्यतिरिक्त गेल्या 24 तासांत राज्यातील 231 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबई ः गेल्या 24 तासांत राज्यात 3 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्य पोलिस दलातील मृतांचा आकडा 107 वर पोहोचला आहे.  गंभीर बाब म्हणजे मृतांमध्ये एक 32 वर्षीय पोलिसाचा सहभाग आहे. या व्यतिरिक्त गेल्या 24 तासांत राज्यातील 231 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

'ST'ला राज्य सरकारकडून पुन्हा संजिवनी देण्याचा प्रयत्न; अर्थमंत्री अजित पवारांनी दिली इतक्या कोटींची मंजूरी

मृतांमध्ये मुंबईतील मरोळ पोलिस ट्रेनिंग स्कूल, ठाणे शहर पोलिस व अहमद नगर पोलिस दलातील पोलिसांचा समावेश आहे. मरोळ पोलिस ट्रेनिंग स्कूलमधील राखीव पोलिस दलातील 51 वर्षीय पोलिस उपनीरीकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते 25 जुलैपासून जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार घेत होते. उपचारादरम्यान मंगळावरी त्यांचा मृत्यू झाला.

ठाणे शहर पोलिसांच्या मुख्यालयात कार्यरत 46 वर्षीय पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 28 जुलैला त्यांचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला होता. तेव्हापासून ते ठाण्यातील वेदांत रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या सहका-यांना चाचणी करण्यास सांगण्यात आले असून तोपर्यंत घरीच विलगीकरणात जाण्यास सांगण्याता आले असल्याचे अधिका-याने सांगितले. कोरोनामुळे अहमद नगर येथील सोनाई पोलिस ठाण्यातील 32 वर्षीय पोलिस शिपायाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ते केवळ 32 वर्षांचे होते. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत त्यांचा मृत्यू झाला.

घोडबंदरमध्ये मुसळधार पावसानं घेतला पहिला बळी, ठाण्यातही अतिवृष्टीचा इशारा

गेल्या 24 तासांत राज्यात 231 पोलिसांना कोरनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्य पोलिस दलातील आतापर्यंत कोरोनाबाधीत झालेल्या पोलिसांचा आकडा 9934 वर पोहोचला आहे. आतापर्यंत राज्यातील 107 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात 10 अधिका-यांचा समावेश आहे. सध्या राज्य पोलिस दलात एक हजार 877 कोरोनाबाधीत सक्रीय रुग्ण आहेत. राज्य पोलिस दलातील 7950 पोलिसांनी कोरोनावर मात केली असून त्यातील बहुसंख्य पोलिस पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत तीन हजार 900 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून मुंबई पोलिस दलातील 56 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the corona on the uniform! Coronas kill so many policemen in the state in 24 hours