नागरिकांना दोन डोस अनिवार्य; कोरोना नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई

Corona Vaccination
Corona Vaccinationsakal media

मुंबई : जगातील अनेक देशांना ग्रासणाऱ्या कोविडच्या नव्या प्रकाराच्या (corona new variant) पार्श्वभूमीवर राज्यात कोविड नियमावली (corona rules) अधिक कडक करण्यात आली आहे. लोकल ट्रेन बरोबरच आता सर्व सार्वजनिक वाहानांमधून फिरण्यासाठी कोविड लसीचे दोन बंधनकारक (vaccination two dose compulsory) करण्यात आले आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे (No mask use in public place),सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचा दंड 200 रुपयांवरुन 500 रुपये (fine) करण्यात आला आहे.

Corona Vaccination
BMC : परदेशी प्रवाशांचे संस्थात्मक अलगीकरण; दर दोन दिवसांनी चाचणी

देशात कोविड नियंत्रणात आलेले असला तरी दक्षिण अफ्रिकेसह काही देशात नवा आणि अधिक घातक व्हेरियंट आढळला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोविड नियमावली अधिक कठोर केली असून त्याबाबतचे आदेश आज जाहीर केले आहेत. कोविडचे दोन डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना एसटी, बेस्ट, रिक्षा, टॅक्‍सीत प्रवास करता येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे,मास्क न वापरणे, थुंबणे अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांनाही आता 500 रुपयांचा दंड करण्यात येणार आहे.नियम न पाळल्यास संबंधीत व्यक्तीसह वाहान चालकाला दंड होणार आहे.

...तर दुकान बंद

दुकानांपासून मॉलपर्यंत तसेच आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांना उपस्थीत राहाणाऱ्यांना कोविड नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे. या नियमावलीचे पालन होत नसल्याचे आढळल्यास 500 रुपयांचा दंड आकारण्यात येईल. तसेच,संबंधीत आयोजक,मालकांना 1 हजार रुपयां पासून 50 हजार रुपयांपर्यंतचा दंड करण्यात येतील. वारंवार असा प्रकार घडत असल्यास मॉल,दुकान,सभागृह,खुल्या जागा सिल करण्यात येतील.

Corona Vaccination
मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या २१४ नव्या रुग्णांची भर; ४ जणांचा मृत्यू

दोन डोस न घेतल्यास RTPCR चाचणी

राज्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोविड लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक आहे.दोन डोस घेतलेले नसतील तर राज्यात प्रवेश करण्या 72 तास पुर्वीची आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्‍यक आहे.या चाचणीचा नकारात्म अहवाल तपासूनच राज्यात प्रवेश दिला जाणार आहे.

-18 वर्षाखालील नागरीक.त्यांना वयाचा पुरावा दाखवावा लागेल.

-लस न घेण्याचे सक्षम वैद्यकिय कारण असल्यास अशा व्यक्ती,त्यांना तसे वैद्यकिय प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे.

भारत न्यूझीलंड सामन्यांवरही मर्यादा

मुंबईतील वानखेडे स्टेडीअमवर 3 डिसेंबरपासून भारत न्यूझीलंडचे क्रिकेट सामने होणार आहे. या सामान्यांनाही या नियमांचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. या नियमानुसार खुल्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांना आसन क्षमतेच्या 25 टक्‍क्‍यांपर्यंत व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे. तर,1 हजार पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थीत राहाणार असतील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

लग्न सोहळ्यांना निम्मी उपस्थिती

बंधीस्त सभागृहात होणारे लग्नसोहळे,सिनेमागृह,नाट्यगृह तसेच बंधीस्त सभागृहात होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाला कार्यक्रमांना आसन क्षमतेच्या 50 टक्के व्यक्तींना उपस्थीतीची परवानगी देण्यात आली आहे.

हे सोबतच ठेवा

- राज्य सरकार मार्फत ऑनलाईन पुरवला जाणारा युनिव्हर्सल पास

-कोविड लसीच्या दुसऱ्या डोसचे प्रमाणपत्र

-ज्या कार्यालयात तसेच इतर ठिकाणी बाहेरी व्यक्तींचा वावर नसेल तेथे कार्यरत असलेल्या व्यक्तींना दोन डोसची अट नसेल.

-खासगी वाहानांमधून प्रवास करण्यासाठी दोन डोसची अट नसेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com