esakal | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर D-Mart बद्दल महत्त्वाची बातमी 
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर D-Mart बद्दल महत्त्वाची बातमी 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर D-Mart बद्दल महत्त्वाची बातमी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारच्या आदेशानंतर महापालिका प्रशासनाने साथ प्रतिबंधात्मक कायदा शहरात लागू केला आहे. त्यामुळे शहरातील सर्व मॉल, सभागृह, सिनेमागृह बंद करण्यात आले आहेत; परंतु यातून किराणा माल वगळल्यामुळे सध्या शहरातील डी-मार्टमध्ये तुडुंब गर्दी होत आहे. सार्वजनिक जागेत गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सरकारने लावलेल्या प्रतिबंधक कायद्यालाच हरताळ फासला जात आहे. त्यामुळे नवी मुंबई  महापालिकेकडून डी-मार्टवर बंदी घालण्याबाबत विचार केला जात आहे. 

मोठी बातमी - असा' असेल होम क्वारंटाईनचा शिक्का, पाहा फोटो...

राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुख्य शहरांमध्ये साथ प्रतिबंधात्मक कायदा लागू केला आहे. या कायद्यामुळे रविवारपासून सर्व मॉल, नाट्यगृह, सिनेमागृह, जिमखाने, जलतरण तलाव आदी सार्वजनिक जागा बंद करण्यात आल्या आहेत; परंतु अत्यावश्‍यक वस्तू असल्यामुळे सरकारने किराणा मालाला वगळले आहे. त्यामुळे शहरातील डी-मार्ट सुरूच आहेत. 

सरकारने लावलेली बंदी वाढली, तर अन्नधान्यांचा भविष्यात टंचाई भासू नये म्हणून नागरिकांनी डी-मार्टमध्ये खरेदीसाठी गर्दी केली आहे. रविवारनंतर सोमवारीही शहरातील अनेक भागांतील डी-मार्टमध्ये गर्दी झाल्याचे आढळून आले. डी-मार्टमध्ये होत असलेल्या गर्दीमुळे सरकारने सार्वजनिक जागांवर गर्दी टाळण्यासाठी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक कायद्यालाच हरताळ फासला जात आहे. या ठिकाणी होत असलेल्या हजारो नागरिकांच्या गर्दीत कोरोना व्हायरस अधिक फोफावण्याची दाट शक्‍यता असल्यामुळे महापालिकेतर्फे सर्व डी-मार्ट बंद करण्याचा विचार केला जात आहे. डी-मार्ट बंद केल्यास नागरिकांना आपल्या परिसरात असणाऱ्या किराणा मालाच्या दुकानांमधून धान्य खरेदी करण्याचे आवाहन पालिकेतर्फे केले जात आहे. 

मोठी बातमी -  जाणून घ्या 'कधी येणार' कोरोनावरील लस; आजपासून चाचण्या सुरु...

सिडकोलाही पत्र देणार 

कोरोना व्हायसरचा अधिक प्रसार होऊ नये, म्हणून महापालिकेने स्वतःच्या हद्दीतील आणि स्वमालकीच्या सर्व सार्वजनिक जागा, उद्याने, मैदाने, सभागृह, नाट्यगृह बंद केली आहेत; परंतु शहरात सिडकोच्या मालकीचे वाशीतील प्रदर्शन केंद्र, सभागृहे तसेच सीबीडी-बेलापूर येथील अर्बन हाट ही सार्वजनिक जागा भाड्याने देऊ नयेत, याकरिता पत्र देणार असल्याचे महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले. 

शाळा कडकडीत बंद 

राज्य सरकारने राज्यभरात साथ प्रतिबंधात्मक कायदा लागू केल्यामुळे 31 मार्चपर्यंत सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर आज पहिला सोमवार असल्यामुळे शहरातील सर्व शाळांनी सरकारच्या निर्णयाचे पालन केले. नवी मुंबई शहरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खासगी शाळा बंद होत्या. तसेच महाविद्यालयातही ज्यांच्या परीक्षा नाहीत, अशा विद्यार्थ्यांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. फक्त ज्या ठिकाणी विद्यापीठाच्या परीक्षा सुरू आहेत. त्याच ठिकाणचे महाविद्यालय सुरू असल्याचे निदर्शनास आले. 

corona update navi mumbai municipal corporation to take decision about dmarts in city

loading image