esakal | Corona Update : राज्यात दुसर्या लाटेनंतरची रूग्णांची निच्चांकी नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

Corona Update : राज्यात दुसऱ्या लाटेनंतरची रूग्णांची निच्चांकी नोंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात कोविड संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर पाहिल्यांदाच बाधित रुग्णसंख्या दोन हजाराच्या खाली आली. मार्च नंतर पाहिल्यांदाच नवीन बाधित रुग्णांची संख्या ही कमी झाली असून आज नवीन रुग्णांची संख्या 1736 पर्यंत खाली आली. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 65,79,608 झाली आहे.कालच्या तुलनेत आज बाधित रुग्ण कमी झाले असले तरी मृत्यू मात्र वाढले आहेत.

राज्यात मृत्यूचा आकडा वाढला असून आज 36 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली.  मृतांचा एकूण आकडा 1,39,578 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 32,115 इतकी आहे.तर 3033 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,04,320 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.34 % एवढे झाले आहे.

औरंगाबाद,नागपूर,अकोला मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 5,नाशिक 10,पुणे 18,कोल्हापूर 1,लातूर 2 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 2,38,474 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,163 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मंडळ नवीन रुग्ण मृत्यू

ठाणे 731 5

नाशिक 359 10

पुणे 482 18

कोल्हापूर 81 01

औरंगाबाद 14 00

लातूर 63 02

अकोला 3 00

नागपूर 3 00

loading image
go to top