ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पालिका अलर्ट; १३ लाख नागरिकांना बुस्टर डोस

Corona Vaccination
Corona Vaccination sakal media

मुंबई : कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या (corona vaccination) पहिल्या तीन टप्प्यांत लस घेतलेल्यांना मुंबईत १० जानेवारीपासून बुस्टर डोस (booster dose) देण्यास सुरुवात होणार आहे. वैद्यकीय कर्मचारी (Medical authorities) , फ्रंटलाईन वर्कर्स (frontline workers), सहव्याधीग्रस्त आणि ज्येष्ठ नागरिक अशा १३ लाख (thirteen lac people) जणांना बुस्टर डोस देण्याची तयारी महापालिकेने (BMC) केली आहे. १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना सोमवार (ता. ३) पासून लस मिळण्यास सुरुवात होणार आहे. ओमिक्रॉनच्या (omicron variant) पार्श्वभूमीवर बुस्टर डोस प्रतिबंधात्मक मानला जात आहे. (corona vaccination booster dose for thirteen lac people from ten January)

Corona Vaccination
परळ रुग्णालयात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मिठी मारत अश्लील शेरेबाजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुस्टर डोसबरोबरच विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची घोषणा केली होती. त्यानुसार महापालिकेने १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे नियोजन केले आहे. मुंबईतील नऊ जम्बो कोविड केंद्रांत या टप्प्यातील लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. झोननुसार अधिकाऱ्यांनाही जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना कोविन ॲपवर नोंदणीसह वॉकईन लस देण्याचीही सोय महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. १० जानेवारीपासून बुस्टर डोस देण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी नोंदणीची प्रक्रियाही जाहीर करण्यात येणार आहे.

यांना मिळणार बुस्टर डोस

- १ लाख ८८ हजार आरोग्य कर्मचारी
- १ लाख ५० हजार फ्रंटलाइन वर्कर्स
- १० लाखांपेक्षा जास्त ज्येष्ठ आणि सहव्याधीग्रस्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com