esakal | अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांच्या लसीकरणासाठी BMC चा प्लान
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांच्या लसीकरणासाठी BMC चा प्लान

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेले लोक अजूनही कोरोना लसीपासून (Corona Vaccination) वंचित आहेत. अशा परिस्थितीत पालिकेने (BMC) आता या लोकांच्या घरी जाऊन लस देण्याचे नियोजन केले आहे. महापालिकेने यासाठी त्या लोकांचा डेटा (People Information) गोळा करण्यास सुरवात केली आहे. राज्य सरकारच्या परवानगीनंतर (State Government Permission) महानगरपालिका लसीकरण सुरू करणार आहे. स्वत: च्या पायाने लसीकरण केंद्रांपर्यंत न पोहोचणाऱ्या नागरिकांचा डेटा मिळावा यासाठी पालिकेने आता एक फॉर्म तयार केला आहे. ज्यात अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांची माहिती भरली जाईल. हा फॉर्म भरण्यासाठी आरोग्य कर्मचारी आण स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या स्वयंसेविकांची (Medical Authorities And volunteers) मदत घेतली जाणार आहे. ( corona vaccination direct at home for people who are unable to come at vaccination center)

या फॉर्ममध्ये वॉर्डचे नाव, हेल्थ पोस्टचे नाव, समन्वयाचे नाव, परिसर, सोसासटी, इमारत किंवा चाळीचे नाव भरायचे आहे.  शिवाय, रुग्णाचे नाव, वय, लिंग, अंथरुणाला खिळल्याचे नेमके कारण, त्याचा कालावधी, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती व्यक्ती कोविड 19 ही लस घेण्यासाठी इच्छुक आहे का? हे सर्व रकाने भरुन घेतले जाणार आहे. ही सर्व माहिती जमा झाल्यावर पालिका या नागरिकांचे लसीकरण करणार आहे.  नुकतेच, महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की,  आजारपणामुळे अंथरुणात खिळलेल्या लोकांचे लसीकरण लवकरच घरोघरी जाऊन केले जाईल. पुण्यातून हा उपक्रम सुरु करण्याविषयी माहिती दिली आहे. म्हणून महापालिकेनेही त्याबाबतची तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा: गिरगाव चौपाटी जवळचं प्रसिद्ध 'क्रिस्टल' हॉटेल बंद होणार?

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, अनेक लोकांनी आम्हाला विनंती केली आहे की त्यांच्या घरात असे काही लोक आहेत जे गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून आजारी आहेत. केंद्रापर्यंत पोहोचणे तर दूर अंथरुणातून उठण्यासही ते अक्षम आहेत. म्हणूनच आम्ही अंथरुणाला खिळलेल्या लोकांच्या घरी जाऊन त्यांना लस देण्याचे ठरवले आहे. आम्ही सर्व प्रभागातील आरोग्य अधिकाऱ्यांना या नागरिकांची माहिती व डेटा गोळा करण्यास सांगितले आहे. या व्यतिरिक्त नागरिक त्यांच्या प्रभागात जाऊन माहितीही घेऊ शकतात.

राज्याच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतिक्षा

 पालिकेच्या आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या उपक्रमासाठी राज्य सरकारकडून लसीकरणाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. लसीच्या कुपीत 10 डोस असतात, आता तीन लोकांच्या घरी लस देण्यात आली, मग उर्वरित डोसचे काय करावे? एखाद्या व्यक्तीला लसीकरणानंतर दुष्परिणाम आढळल्यास काय करावे? पण, आम्ही सध्या घरोघरी जाऊन लसीकरणाची तयारी करत आहोत.

हेही वाचा: उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यावर राणे तुम्ही काय प्रतिक्रिया दिली ते जरा आठवा - अरविंद सावंत

6 महिन्यांपासून आजारी किंवा अंथरुणावर असेल तरच मिळणार लस

 पालिकेला मुंबईकरांना हे स्पष्टपणे सांगायचे आहे की, त्यांनी महापालिकेला योग्य माहिती द्यावी. घर पोहोच लसीकरण फक्त त्या नागरिकांसाठी आहे जे गेल्या 6 महिन्यांपासून आजारामुळे अंथरुणाला खिळून पडले आहेत. त्यासाठी, रूग्णाच्या नातेवाईकांना रुग्णाचे वैद्यकीय प्रमाणपत्र पालिकेला दाखवावे लागेल, त्यानंतरच त्या व्यक्तीचे लसीकरण केले जाईल.

loading image