13 खासगी रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात, कोविन पोर्टलची अडचण कायम

13 खासगी रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात, कोविन पोर्टलची अडचण कायम

मुंबई: तिसर्‍या टप्प्यातील लसीकरणासाठी केंद्राची परवानगी मिळाल्यानंतर गुरुवारपासून मुंबईतील 13 खासगी रुग्णालयात लसीकरणाचे काम सुरू झाले आहे. खासगी रुग्णालयांच्या म्हणण्यानुसार ज्या लाभार्थींची नोंदणी आधीच झाली होती त्यांचे लसीकरण अगदी सहज झाले. मात्र नोंदणी न करता आलेल्यांची नोंदणी करणे फारच अवघड होते. कोविन पोर्टलच्या सर्व्हर डाऊन होणे, गर्दी वाढणे आणि लसीकरणाची वेळ संपल्या कारणाने अनेक लाभार्थींना प्रतिक्षा यादी ठेवे गेले. 

गुरुवारी ज्यांना काही कारणास्तव लस मिळाली नाही त्यांना दुसर्‍या दिवशी बोलवण्यात आले आहे.  पालिकेच्या लसीकरण अधिकारी डॉ. शीला जगताप यांनी सांगितले की, केंद्राने 29 खासगी रुग्णालयांना लसीकरण करण्यास परवानगी दिली असून त्यापैकी सोमवारपासून 3 रुग्णालयात लसीकरण सुरू झाले आहे. त्यातील ठाणे आणि टाटा रुग्णालय आहे. म्हणजेच, उर्वरित 24 रुग्णालयांपैकी 13 रुग्णालयांनी गुरुवारी लसीकरणाचे काम सुरू केले आहे. येत्या एक ते दोन दिवसांत इतर रूग्णालयातही लसीकरणाचे काम सुरू होईल. 

या रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू

पालिकेच्या 24 लसीकरण केंद्रांव्यतिरिक्त, गुरुवारी नानावटी, सैफी, हिंदुजा, हिरानंदानी, होली फॅमिली, लीलावती, फोर्टिस, भाटिया, ग्लोबल, जसलोक, कोकिलाबेन, पारेख आणि बॉम्बे रुग्णालयात लसीकरण सुरू झाले आहे. 

210 लोकांना लसीकरण

पालिकेने आम्हाला लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील 210 लाभार्थ्यांना लस देण्याचे लक्ष्य दिले आणि आम्ही पहिल्या दिवशी ते लक्ष्य गाठले. आमच्याकडे एकूण 8 बूथ आहेत, त्यात आम्ही अधिक लोकांना लस देऊ शकतो. काही लाभार्थ्यांना आम्हाला परत पाठवावे लागले कारण सर्व्हर डाऊन झाल्यामुळे त्यांची नोंदणी करता आली नाही. 
डॉ. रवी शंकर, सीओओ, लीलावती रूग्णालय

100 जणांना टीका, 30 जण प्रतीक्षा यादीत

45 आणि त्याहून अधिक वयाची (रूग्ण) 200 लोकांना लस देण्याचे लक्ष्य दिले गेले होते, त्यापैकी 100 जणांना लसीकरण करण्यात आले आणि 30 जणांना प्रतीक्षा यादीत ठेवले गेले. वस्तुतः पोर्टलमध्ये नोंदणी न  झाल्यामुळे, त्यांना दुसर्‍या दिवशी बोलवण्यात आले आहे. लाभार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आधीच नोंदणी करावी. 
डॉ. विवेक तलौलीकर, सीईओ, ग्लोबल रूग्णालय

 रात्री 9 वाजेपर्यंत लसीकरण 

रुग्णालयांमधील लाभार्थ्यांची वाढती गर्दी पाहता आम्ही केंद्राला लसीकरणाची वेळ वाढवण्यास सांगितले आहे. पुढील एक ते दोन दिवसात परवानगी मिळाल्याबरोबर आम्ही रात्री 9 वाजेपर्यंत लस देऊ. सध्या, आम्ही संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लसीकरण करण्यास सक्षम आहोत, त्यानंतर कोविन पोर्टल बंद होत आहे. 
सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona Vaccination started in 13 private hospitals in Mumbai from Thursday

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com